Kangana Ranaut | कंगना रनौत कोर्टाच्या आदेशाच आज तरी पालन करणार का?

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295a आणि 153a या कलमानुसार गुन्हा दाखल आहे.

Kangana Ranaut | कंगना रनौत कोर्टाच्या आदेशाच आज तरी पालन करणार का?
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 9:26 AM

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut)  विरोधात वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहिता कलम 295a आणि 153a या कलमानुसार गुन्हा दाखल आहे. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी कंगनाविरोधात गुन्हा दाखल आहे. मेट्रोपोलिटीन मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कास्टिंग डायरेक्ट असलेल्या मूनवर अली सय्यद यांनी कोर्टात अर्ज करून कंगनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. (Kangana Ranaut will arrive at Bandra Police Station today for questioning)

सय्यद यांच्या अर्जाची दखल घेऊन कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल केल्या नंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावल होते. मात्र , वैयक्तिक कारणास्तव ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती. यानंतर पोलिसांनी तिला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली होती.

आणि त्यात तिला 23 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं. मात्र, तिसऱ्या नोटिशीला तिने प्रतिसाद दिला नव्हता. उलट तिने हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टाने तिला चौकशीसाठी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आज (शुक्रवार) कंगनाला वांद्रे पोलीस स्टेशन येथे चौकशीसाठी हजर राहवे लागणार आहे. मात्र, कंगनाची फक्त दोन तासच चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी 18 नोव्हेंबर रोजी तिसऱ्यांदा समन्स बजावला होता. कंगनासह तिची बहिण रंगोली रनौत-चंडेल हिलाही मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. त्यामुळे या दोघींनाही वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. 23 नोव्हेंबरला कंगनाला, तर 24 नोव्हेंबरला रंगोलीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

पहिला समन्स – 26 आणि 27 ऑक्टोबर

दुसरा समन्स – 9 आणि 10 नोव्हेंबर

तिसरा समन्स – 23 आणि 24 नोव्हेंबर

संबंधित बातम्या :

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, ‘या’ 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस

(Kangana Ranaut will arrive at Bandra Police Station today for questioning)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.