Dhaakad | कंगना रनौतचा धाकड चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित!

कंगना रनौतचा (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे

Dhaakad | कंगना रनौतचा धाकड चित्रपट 'या' तारखेला होणार प्रदर्शित!
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 2:28 PM

मुंबई : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) धाकड (Dhaakad) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या कंगना या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि यादरम्यान तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून त्या पोस्टरमध्ये कंगनाच्या हातात तलवार आणि जवळच मृतदेह पडलेले दिसत आहेत. हे पोस्टर शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘ निर्भय आणि क्रूर आहे. भारताचा पहिला महिला लीड अ‍ॅक्शन चित्रपट 1 ऑक्टोबर 2021 रोजी प्रदर्शित होईल.’ (Kangana Ranaut’s Dhaakad movie released on 1 October 2021)

कंगना सध्या भोपाळमध्ये तिच्या आगामी धाकड (Dhaakad) चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंग दरम्यान कंगनाला एका आंदोलनाचा सामना करावा लागला होता. भोपाळमध्ये कंगनाच्या शूटच्या वेळी एका राजकीय गटाने कंगनाविरोधात जोरदार आंदोलन करत घोषणा दिल्या होत्या. त्याची मागणी होती की, कंगनाने भोपाळमध्ये शूटिंग करू नये, तिने भोपाळमधून परत जावे. मात्र, कंगना या आंदोलनाला न घाबरता शूटिंग करत आहे. भोपाळला कंगना धाकडचे अ‍ॅक्शन सीन येथे शूट करत आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली होती. यापूर्वी कंगनाने पंगा आणि मणिकर्णिका चित्रपटाचे शूट मध्यप्रदेशमध्ये केले आहे. आता ती तिसऱ्यांदा भोपाळमध्ये शूटिंग करत आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या भेटीनंतर कंगनाने सांगितले आहे की, मध्यप्रदेशमध्ये धाकड चित्रपट करमुक्त होण्याची शक्यता आहे.

कंगनाने नुकताच ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ या तिच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. थलावली चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटल प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.

संबंधित बातम्या : 

Big News : करण जोहरच्या ‘LIGER’चित्रपटाद्वारे विजय देवरकोंडाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण, पाहा चित्रपटाचा पहिला लूक

Dhamaka | कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘धमाका’ ओटीटीवर प्रदर्शित होणार?

(Kangana Ranaut’s Dhaakad movie released on 1 October 2021)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.