ऋषभ शेट्टी थेट म्हणाला, मुळात मला अशा अभिनेत्री आवडतच नाहीत, वाचा काय घडले?
आता रश्मिका मिशन मजनू या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २० जानेवारी रोजी रिलीज होतोय.
मुंबई : रश्मिका मंदाना हे साऊथमधील अत्यंत फेमस नाव आहे. रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचा चाहता वर्गही मोठा आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मिका मंदाना हिचा आणि अमिताभ बच्चन यांचा गुडबाय हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये वडील आणि मुलीचे सुंदर असे नाते दाखवण्यात आले होते. या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. रश्मिका मंदाना हिने थेट गुडबाय चित्रपटाच्या माध्यमातून बिग बी यांच्यासोबत काम करत बाॅलिवूडमध्ये (Bollywood) डेब्यू केला. आता रश्मिका मिशन मजनू या चित्रपटामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २० जानेवारी रोजी रिलीज होतोय. रश्मिकाने आपले बाॅलिवूड पदार्पण धुमधडाक्यात नक्कीच केलंय.
काही दिवसांपूर्वी कन्नडमधून रश्मिका मंदानाच्या चित्रपटांना विरोधात केला जात होता. रश्मिका हिने आतापर्यंत साऊथमधील अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, कन्नडमधून रश्मिकाला कायमच विरोध होतो.
चित्रपट कांताराचा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी कायमच रश्मिका मंदानाला टार्गेट करताना दिसतो. इतकेच नाहीतर नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टी याने मोठे विधान केले आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रश्मिका मंदाना हिने तिच्या डेब्यू चित्रपटाबद्दल सांगितले होते. मात्र, यावेळी तिने कोणाचेही नाव घेतले नाही किंवा या चित्रपटाचे श्रेयही कोणाला दिले नव्हते. यानंतर चाहत्यांनी रश्मिका मंदानाला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.
यावर नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टी म्हणाला, मला काही फरक पडत नाही. मी अनेकांना लॉन्च केले असून अनेक अभिनेत्यांनी चित्रपट दिग्दर्शकासोबतही काम केले आहे.
यावर मला काहीच बोलायचे नाहीये. मला मुळात म्हणजे ‘या’ प्रकारच्या अभिनेत्री आवडत नाहीत…मला नव्या लोकांसोबत काम करायला आवडत असल्याचे देखील ऋषभ शेट्टी याने म्हटले आहे.
ऋषभ शेट्टी याने नाव न घेता रश्मिका मंदाना हिच्यावर टीका केली आहे. ऋषभ शेट्टी याने यापूर्वीही रश्मिका मंदानाविषयी काही मोठे भाष्य केले आहेत. कांतारा चित्रपटापासून ऋषभ शेट्टी याच्या चाहता वर्गामध्ये मोठी वाढ झालीये.