Corona | कपूर परिवारावर कोरोनाचा कहर! अर्जुन, अंशुला, रियासह करण बुलानीला कोरोनाची लागण

बॉलिवूड सेलिब्रिटींवर कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांच्यानंतर आता ‘कपूर’ परिवार कोरोनाचा शिकार ठरला आहे. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर आणि करण बुलानी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण आता घरी क्वारंटाईन आहेत.

Corona | कपूर परिवारावर कोरोनाचा कहर! अर्जुन, अंशुला, रियासह करण बुलानीला कोरोनाची लागण
Arjun-anshula-riya
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 2:19 PM

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटींवर कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांच्यानंतर आता ‘कपूर’ परिवार कोरोनाचा शिकार ठरला आहे. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर आणि करण बुलानी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण आता घरी क्वारंटाईन आहेत.

बोनी कपूर यांचीही तब्येत ठीक नव्हती, पण वेबसाईटच्या माहितीनुसार त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अर्जुनला या आधीही कोरोनाची लागण!

यापूर्वीही अर्जुन कपूर कोरोनाचा बळी ठरला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यावेळी त्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती. मागच्या वेळीही अर्जुनने स्वतःला घरी क्वारंटाईन केले होते.

अंशुलाचा वाढदिवस

आज (29 डिसेंबर) अंशुलाचा वाढदिवस देखील आहे आणि नेमकी आजच ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. अंशुला आणि अर्जुनने आज सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. परंतु, अद्याप त्यांनी कोरोना झाल्याबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही किंवा कोणतीही माहिती दिलेली नाही.

रिया कपूरने दिली अपडेट

रिया कपूरने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘होय, पूर्ण खबरदारी घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. ही माझी खाजगी बाब आहे, पण मला कळत नाही की, हा इतका मोठा मुद्दा का बनवला जात आहे. ही माहिती फक्त सरकारी आणि मेडिकलशी संबंधित लोकांसाठी आहे, जेणेकरून ते त्यांचे काम करू शकतील, इतर कोणत्याही गॉसिप साईटसाठी नाही.’

View this post on Instagram

A post shared by eWood (@ewood_ent)

रियाने पुढे लिहिले की, ‘मी आणि माझे पती क्वारंटाईन आहोत आणि पूर्ण खबरदारी घेत आहोत. डोकेदुखी आहे. पण आशा आहे की, आम्ही लवकर बरे होऊ. आमच्या आरोग्याबद्दल विचारणा करणाऱ्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.’ आता कपूर कुटुंबातील बाकीच्यांच्या तब्येतीची चिंता चाहत्यांना लागली आहे. जान्हवी, खुशीचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहे. जान्हवी नुकतीच सहलीनंतर घरी परतली आहे.

हेही वाचा :

Rajesh Khanna Birth Anniversary | अभिनेत्रीशी ब्रेकअप झाल्यानंतर मुद्दाम तिच्या घरासमोरून वरात घेऊन गेले राजेश खन्ना! वाचा किस्सा…

Happy Birthday Twinkle Khanna | अक्षयसोबतचा साखरपुडा मोडताच डिप्रेशनमध्ये गेली, अखेर पैज हरल्यानंतर ट्विंकलने केले लग्न!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.