Rocky Aur Rani Ki Prem Kahani : ‘गली बॉय’नंतर करण जोहरने पुन्हा बनवली रणवीर-आलियाची जोडी, पुढच्या वर्षी रिलीज होणार चित्रपट!

दिग्दर्शक-निर्माता करण जोहर (Karan Johar) याने त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) असे या चित्रपटाचे नाव आहे. करण जोहर स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : ‘गली बॉय’नंतर करण जोहरने पुन्हा बनवली रणवीर-आलियाची जोडी, पुढच्या वर्षी रिलीज होणार चित्रपट!
रणवीर-आलिया-करण
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 12:23 PM

मुंबई : दिग्दर्शक-निर्माता करण जोहर (Karan Johar) याने त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘रॉकी और रानी की प्रेमकथा’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) असे या चित्रपटाचे नाव आहे. करण जोहर स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटासाठी करण जोहरने रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना मुख्य भूमिकांसाठी साईन केले आहे (Karan Johar Announces his next project Rocky Aur Rani Ki Prem Kahani starring Ranveer Singh and Alia Bhatt).

या प्रोजेक्टची घोषणा करताना करण म्हणाला की, हा चित्रपट 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. स्वतः करण जोहरने काल जाहीर केले होते की, तो तब्बल 5 वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शनाकडे परत येत आहे. ‘कुछ कुछ होता है’ ने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा करण जोहर आज देशातील सर्वात मोठा चित्रपट निर्माता झाला आहे.

पाहा करण जोहरचे ट्विट

या चित्रपटाची कथा करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शन या कंपनीचे लेखक इशिता मोईत्रा, सुमित रॉय आणि शशांक खेतान यांनी लिहिली आहे. लेखक शशांक खेतान हा बराच काळ करण जोहरशी संबंधित होता आणि आता तो करण जोहरच्या चित्रपटांचा निर्माताही बनला आहे.

सर्वात मोठा पॉवरहाऊस

नुकतेच आपल्या बॉलिवूड कारकिर्दीबद्दल बोलताना करण जोहरने सांगितले होते की, त्याने धर्मा प्रॉडक्शन, धर्माटीक, धर्मा कॉर्नरस्टोन कंपनी सोबत धर्मा 2.0 कसे लाँच केले आहे. करणने आज आपल्या कंपन्यांना देशातील सर्वात मोठी फिल्म पॉवरहाऊस प्रोडक्शन कंपनी बनवली आहे. अलीकडेच त्याने डीसीए ही टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली.

या कंपनीत अभिनेते तसेच चित्रपट निर्मात्यांचेही टॅलेंट मॅनेज केले जात आहे. करणने ही कंपनी मोठी करण्यासाठी हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. करणने त्याच्याबरोबर सुरू केलेल्या उर्वरित कंपन्या मूल्य आणि चित्रपट निर्मितीच्या बाबतीत खूप मागे राहिल्या आहेत.

2015मध्ये करणने रणबीर कपूर, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ज्यांना प्रेमकथा आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट अतिशय खास ठरला होता.

करण जौहर हा चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभाशाली सेलिब्रिटी आहे. तो लेखक, दिग्दर्शक, निर्माता, फॅशन डिझायनर, अभिनेता, सर्वात महागडा टीव्ही होस्ट तसेच एक चांगला मुलगा आणि दोन मुलांचा उत्तम पिता देखील आहे.

(Karan Johar Announces his next project Rocky Aur Rani Ki Prem Kahani starring Ranveer Singh and Alia Bhatt)

हेही वाचा :

15 फिल्म, 20 मालिकांमध्ये दमदार काम, कॅन्सरनं गाठलं, आर्थिक विवंचना, घरातलं सामान विकण्याची हिरोईनवर वेळ

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, ‘हिरा मंडी’मध्ये दिसणार एका खास भूमिकेत

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.