मुंबई : शो कोणताही आणि कोणाचाही असो तिथे चर्चा होते फक्त आणि फक्त करण जोहर याची. करण जोहर हा नुकताच मलायका अरोरा हिच्या मूविंग इन विद मलाइका या शोमध्ये नुकताच झाला. ज्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शो जरी मलायकाचा असला तरीही हवा करण जोहरचीच दिसत आहे. कारण शोमध्ये करण जोहर याने मलायका अरोराला असे काही तिखट प्रश्न विचारले की, त्याची तुफान चर्चा रंगताना दिसत आहे. मलायका हिने देखील करण जोहर याला जोरदार प्रतिउत्तर दिले. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही मूविंग इन विद मलाइका या शोमध्ये अनेक मोठे खुलासे करत आहे.
मूविंग इन विद मलाइका या शोमध्ये नुकताच करण जोहर या सहभागी झाला. यावेळी करण आणि मलायका आणि धमाल केली. परंतू करण जोहरच्या काही प्रश्नांवर उत्तर देताना मलायका अरोरा चांगली वैतागली होती.
या शोच्या माध्यमातून पहिल्यांदाच अभिनेत्री मलायका अरोरा हिने ओटीटीमध्ये डेब्यू केला आहे. याची एक पोस्ट मलायका हिने सोशल मीडियावर शेअर करत म्हटले होते की, मी अखेर हो म्हटले आहे. या पोस्टवरून अनेक चर्चांना उधाण झाले होते.
शोमध्ये अचानक करण जोहर हा मलायका अरोरा हिला सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. यामुळे मलायकाचा चांगलाच गोंधळ उडतो. इतकेच नाहीतर करण हा मलायकाला चक्क बेडरूम सीक्रेट्स देखील विचारतो.
करण जोहर मलायकाला विचारताना दिसतो की, तू आणि अर्जुन बेडरूममध्ये काय एक्सपेरिमेंट करता? परंतू यावेळी मलायका अरोरा हिने करण जोहरच्या प्रश्नांना उत्तर देणे टाळले. मलायकाला तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलणे फार आवडत नाही.
करण जोहरच्या प्रश्नांना मलायका उत्तर देत नाही हे पाहून मग करण हा स्वत:च्या पर्सलन लाईफबद्दल सांगण्यास सुरूवात करतो. मलायका आणि करण जोहरचा हा एपिसोड खास होणार हे नक्कीच आहे.