Karan Johar | पठाण चित्रपटाची कमाई पाहून करण जोहर याने केले मोठे विधान, म्हणाला द्वेषाला…

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने ओपनिंग डेला धमाका करत बाॅलिवूडचे चित्रपट देखील साऊथच्या चित्रपटांपेक्षा कमी नाहीत हे दाखवू दिले आहे.

Karan Johar | पठाण चित्रपटाची कमाई पाहून करण जोहर याने केले मोठे विधान, म्हणाला द्वेषाला...
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 7:36 PM

मुंबई : शाहरुख खान याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का दिलाय. कारण पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा हंगामा झाला होता. देशामधील अनेक ठिकाणी चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्यात आली होती. इतकेच नाहीतर सतत सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे (Bollywood) चित्रपट फ्लाॅप ठरताना दिसत आहेत. आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांचे चित्रपट (Movie) देखील बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेल्याने अनेकांनी धसका घेतला होता.

एकीकडे बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात होते आणि दुसरीकडे साऊथचे चित्रपट जबरदस्त अशी कामगिरी बाॅक्स आॅफिसवर करत होते. मात्र, शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने ओपनिंग डेला धमाका करत बाॅलिवूडचे चित्रपट देखील साऊथच्या चित्रपटांपेक्षा कमी नाहीत हे दाखवू दिले आहे.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने मोठ्या वादाला तोंड फुटले आणि तेंव्हापासूनच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू होती.

karan johar

सोशल मीडियावर पठाण चित्रपटाच्या विरोधात वातावरण असल्याने अनेकांना वाटले की, चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकणार नाही. परंतू या वादाचा चित्रपटाला फायदा झाल्याचे दिसत आहे.

जगभरातून ओपनिंग डेला साधारण १०० कोटींची कमाई पठाण चित्रपटाने केली आहे. पुढील काही दिवस पठाण चित्रपट धमाकेदार कमाई करू शकतो. आजही चित्रपटाचे अनेक शो हे हाऊसफुल झाल्याचे बघायला मिळाले.

पठाण चित्रपटाची जबरदस्त ओपनिंग पाहून आता चित्रपट निर्माता करण जोहर याने इंस्टा स्टोरीवर एक खास पोस्ट शेअर केलीये. आता करण जोहर याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

करण जोहर याने पोस्टमध्ये म्हटले की, प्रेम नेहमीच द्वेषाला हरवते…यापूर्वीही करण जोहर याने शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाचे काैतुक केले होते. आता पठाण चित्रपट कोणते रेकाॅर्ड तोडतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.