Karan Johar | शाहरुख खान याच्यामुळे करण जोहर लागला ढसाढसा रडायला, वाचा काय घडले होते सेटवर

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने कमाईमध्ये मोठा धमाका करत अनेक चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडले आहेत. करण जोहर हा देखील प्रियांका चोप्रा हिने केलेल्या आरोपांपासून चर्चेत आहे.

Karan Johar | शाहरुख खान याच्यामुळे करण जोहर लागला ढसाढसा रडायला, वाचा काय घडले होते सेटवर
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 8:55 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर जबरदस्त अशी कामगिरी केली. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरलाय. पठाण (Pathaan) चित्रपटाने बाहुबली चित्रपटाचा रेकाॅर्ड तोडलाय. पहिल्याच दिवशी शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिसवर कलेक्शन करत सर्वांनाच मोठा झटका दिला. पठाण चित्रपट (Movie) रिलीज होण्याच्या अगोदर सतत त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती.

शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेला आणि तो मोठ्या पडद्यापासून दूर गेला. शाहरुख खान हा कधी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार की नाही हाच मोठा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता.

शेवटी पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने दणदणीत असे पुनरागमन नक्कीच केले आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटानंतर डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. सध्या जवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये शाहरुख खान हा बिझी आहे. सर्वांनाच माहिती आहे की, करण जोहर आणि शाहरुख खान हे खूप जास्त चांगले मित्र आहेत. मात्र, एकदा शाहरुख खान याचे बोलणे ऐकून करण जोहर हा ढसाढसा रडला.

एका शोमध्ये करण जोहर याने हा किस्सा सांगितला. शाहरुख खान याने आतापर्यंत करण जोहर याच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. करण जोहर याने कल हो न हो चित्रपटाच्या सेटवरील किस्सा सांगितला. करण जोहर म्हणाला की, कल हो न हो चित्रपटाचे आम्ही शूटिंग करत होतो. यावेळी सैफ अली खान आणि प्रिती झिंटा हे सतत त्यांचे डायलॉग विसरत होते.

यावर शाहरुख खान भडकला आणि मला म्हणाला की, इथे कामाचे गांर्भिय कोणालाच नाहीये. इथे मजाक होत आहे? तू सर्वांना बिघडून ठेवले आहे. कोणीच आपले काम व्यवस्थित करत नाहीये. असे तर या लोकांना फिल्मफेयर अवॉर्ड मिळेल, पण मला नाही. शाहरुख खान याचे हे बोलणे ऐकून मी ढसाढसा रडायला लागलो, असे करण जोहर हा म्हणाला. शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही याच वर्षी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.