Good News : कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते करिना!

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) केव्हाही आई होऊ शकते.

Good News : कोणत्याही क्षणी बाळाला जन्म देऊ शकते करिना!
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 5:18 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) कोणत्याही क्षणी आई होऊ शकते. असे सांगितले जात आहे की, करिनाला कोणत्याही वेळी प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. करिनाची आई बबिताही रात्री उशिरा करिश्मा कपूरसमवेत करिनाच्या घरी आली होती. सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये करिश्मा कपूर आणि बबिता यांच्याशिवाय सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिमही दिसत आहे. (Kareena Kapoor Khan will be a mother for the second time)

करिना दुसऱ्यांदा आई बनणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करिनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. असे म्हटले होते की, करिना फेब्रुवारी महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. करिनाच्या डिलिव्हरी अगोदर सैफ अली खान आपले काम पूर्ण करून घेत आहे. 2016मध्ये जेव्हा करिना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता.

दरम्यान, तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता. प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली होती.

पूर्वी त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करिना कपूर खान होती. यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले होते. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. ‘प्रेगा न्यूज’ होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या : 

प्रभासच्या ‘या’ चित्रपटाच्या एका सीनसाठी मोजले तब्बल इतके कोटी!

पोटाचा घेर वाढला तर रोमान्स होत नाही यार, राखी सावंतचे बिनधास्त बोल

सनी लिओनचा निळा स्विमसूट इंटरनेटवर चर्चेत, लूक पाहून चाहतेही घायाळ!

(Kareena Kapoor Khan will be a mother for the second time)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.