कार्तिक आर्यन याने सारा अली खान हिच्यासोबतच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंबद्दल सांगितले सत्य, म्हणाला आम्ही दोघे…
शहजादा या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत क्रिती सेनन ही मुख्य भूमिकेत आहे. या दोघांनी चित्रपटाचे प्रमोशन जोरदार केले. रविवारी शहजादा या चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) याचा शहजादा हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. रिलीजच्या अगोदर या चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. मात्र, ओपनिंग डेला चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. 17 फेब्रुवारी रोजी शहजादा हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. मात्र, या दिवशी पठाण चित्रपटाच्या तिकिटाचा दर 110 रूपये करण्यात आला. प्रेक्षकांनी शहजादाकडे पाठ फिरवत पठाण पाहणे पसंद केले. पठाण चित्रपटामुळे शहजादाला नक्कीच फटका बसला आहे, शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 25 दिवस झाले आहेत, तरीही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाचे जादू बघायला मिळत आहे. शाहरूख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शहजादा या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत क्रिती सेनन ही मुख्य भूमिकेत आहे. या दोघांनी चित्रपटाचे प्रमोशन जोरदार केले. रविवारी शहजादा या चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
कार्तिक आर्यन हा त्याच्या शहजादा या चित्रपटासोबतच त्याच्या पर्सनल लाईफमुळेही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत एक चर्चा रंगत आहे, ती म्हणजे कार्तिक आर्यन हा सारा अली खान हिला डेट करतोय. मात्र, यावर नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यन हा स्पष्ट बोलला आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंवरून चर्चा सुरू होती की, सारा आणि कार्तिक आर्यन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे हे फोटो राजस्थानमधील उदयपुरमधील होते.
या फोटोंवरही कार्तिक आर्यन याने भाष्य केले आहे. कार्तिक आर्यन म्हणाला की, मुळात म्हणजे सारा आणि मी त्यादिवशी अचानक भेटलो होतो. त्यावेळी कोणीतरी फोटो क्लिक केले होते. विशेष म्हणजे तिथे खूप सारे लोक होते, जे अगोदरपासूनच फोटो क्लिक करत होते.
एक दोन फोटो असे आहेत, जे पाहून मला स्वत: ला धक्का बसला. पुढे कार्तिक आर्यन याला विचारण्यात आले की, तू सारा अली खान हिच्यासोबत कोणता चित्रपट करणार आहेस का? यावर कार्तिक आर्यन म्हणाला की, अजून तरी असे काही नाहीये. मला याबद्दल काही माहिती नाहीये. गेल्या काही वर्षांपासून सतत कार्तिक आर्यन याचे नाव सारा अली खान हिच्यासोबत जोडले जात आहे.