Bhool Bhulaiyaa 2: ‘गंगुबाई काठियावाडी’वर भारी पडली ‘मोंजोलिका’, पहिल्या आठवड्यात ‘भुल भुलैय्या 2’ची दमदार कमाई

देशभरात या चित्रपटाची कमाई आतापर्यंत जवळपास 92 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांच्या यादीत 'भुल भुलैय्या 2'चा समावेश झाला आहे.

Bhool Bhulaiyaa 2: 'गंगुबाई काठियावाडी'वर भारी पडली 'मोंजोलिका', पहिल्या आठवड्यात 'भुल भुलैय्या 2'ची दमदार कमाई
'गंगुबाई काठियावाडी'वर भारी पडली 'मोंजोलिका'Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 4:56 PM

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा अडवाणी यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैया 2’ (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाने थिएटरमध्ये पहिला आठवडा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरूच ठेवली आहे. देशभरात या चित्रपटाची कमाई आतापर्यंत जवळपास 92 कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई करणाऱ्या टॉप 3 चित्रपटांच्या यादीत ‘भुल भुलैय्या 2’चा समावेश झाला आहे. या यादीत The Kashmir Files पहिल्या क्रमांकावर आहे. तर आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाला कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने मागे टाकलं आहे.

द काश्मीर फाइल्सने पहिल्या आठवड्यात 97.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर गंगूबाई काठियावाडीने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या सात दिवसांत 68.93 कोटी रुपयांची कमाई केली होती. किंबहुना हिंदीमध्ये डब केलेले दाक्षिणात्य चित्रपट RRR आणि KGF Chapter 2 यांची पहिल्या आठवड्यात याहून अधिक कमाई झाली. कमाईच्या बाबतीत या चित्रपटांना अद्याप कोणत्या बॉलिवूड चित्रपटाने मात दिली नाही.

हे सुद्धा वाचा

बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे शेअर करताना चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर लिहिलं, “भुल भुलैय्या 2 ची पहिल्या आठवड्यातील कमाई जबरदस्त आहे. चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. पुढील दिवसांत कमाईत आणखी वाढ होऊ शकेल. लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल.” भुल भुलैया 2 हा कार्तिकच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सोनू के टिटू की स्वीटू या चित्रपटाच्या लाइफटाईम कमाईला मागे टाकण्यात भुल भुलैय्या 2ला यश मिळेल, असं त्यांनी म्हटलंय.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

भुल भुलैय्या 2ची कमाई-

शुक्रवार- 14.11 कोटी रुपये शनिवार- 18.34 कोटी रुपये रविवार- 23.51 कोटी रुपये सोमवार- 10.75 कोटी रुपये मंगळवार- 9.56 कोटी रुपये बुधवार- 8.51 कोटी रुपये गुरुवार- 7.27 कोटी रुपये एकूण- 92.05 कोटी रुपये

100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होणारा हा या वर्षातील पाचवा चित्रपट ठरेल. याआधी गंगूबाई काठियावाडी, द काश्मीर फाइल्स, आरआरआर आणि केजीएफ 2 या चार चित्रपटांनी या वर्षात 100 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अनीस बाजमी दिग्दर्शित भूल भुलैया 2 चित्रपटात कार्तिक आर्यन, कियारा अडवाणीसह संजय मिश्रा, राजपाल यादव आणि तब्बू यांच्याही भूमिका आहेत. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या’चा हा सीक्वेल आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.