हातात चूडा, गुलाबी साडी…कतरिना कैफच्या करवा चौथची गोष्टच निराळी, पाहा विकीची पोस्ट
कतरिनाच्या करवा चौथचे फोटो पाहण्यासाठी चाहते प्रचंज उत्सुक होते. त्यामध्ये कतरिनाने तिच्या पहिल्या करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी काैशल कायमच चर्चेत असतात. कतरिनाने लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केलाय. कतरिनाच्या करवा चौथचे फोटो पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. त्यामध्ये कतरिनाने तिच्या पहिल्या करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केले आहेत, हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर करवा चौथचे काही फोटो शेअर केलीत. या फोटोंमध्ये (Photo) कतरिनाचा लूक एकदम सुंदर दिसतोय.
इथे पाहा कतरिनाने शेअर केलेली पोस्ट
View this post on Instagram
कतरिनाने करवा चौथच्या शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की, तिने सुंदर अशी गुलाबी रंगाची साडी घातलीये. या साडीमध्ये कतरिनाचा लूक जबरदस्त दिसतोय. कतरिनाने यासोबतच लाल रंगाचा चूडा देखील हातात घातलाय. केस मोकळे सोडत तिने सिंदूर देखील भरला आहे. करवा चौथनिमित्ताने कतरिना एकदम ट्रेडिशन लूकमध्ये दिसत आहे. कतरिनाचा हा लूक आणि फोटो दोन्ही चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
इथे पाहा विकीने शेअर केलेली पोस्ट
View this post on Instagram
विकी कौशलने करवा चौथच्या दिवशी पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कतरिना आणि विकी सुंदर दिसत आहेत. विकीने शेअर केलेला हा फोटोही चाहत्यांना आवडलाय. 9 डिसेंबर 2021 रोजी कतरिना आणि विकीने राजस्थानमध्ये लग्न केले. बरीच वर्ष डेट केल्यानंतर विकी आणि कतरिनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. बाॅलिवूडमध्ये करवा चौथची एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. अनेक सेलिब्रेटींची करवा चौथची फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.