Katrina Kaif: मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न का केलं? कतरिनाने अखेर सोडलं मौन

इतर सेलिब्रिटींप्रमाणे 'बिग-फॅट वेडिंग' न करता विकी आणि कतरिनाने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित साधेपणानं लग्न करणं पसंत केलं. याविषयी अखेर कतरिना कैफने मौन सोडलं आहे.

Katrina Kaif: मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न का केलं? कतरिनाने अखेर सोडलं मौन
विकी कौशल-कतरिना कैफImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 3:49 PM

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांनी डिसेंबर 2021 मध्ये राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. फोर्ट सिक्स सेन्सेस याठिकाणी पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला (Wedding) मोजकेच पाहुणे उपस्थित होते. इतर सेलिब्रिटींप्रमाणे ‘बिग-फॅट वेडिंग’ न करता विकी आणि कतरिनाने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थित साधेपणानं लग्न करणं पसंत केलं. याविषयी अखेर कतरिना कैफने मौन सोडलं आहे. मोजक्यात पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न का केलं, यामागचं कारण तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत कतरिना म्हणाली, “लग्नसोहळा खासगीत पार पाडण्यापेक्षा आम्ही कोरोनाच्या नियमांमुळे अधिक सावध होतो. माझ्या कुटुंबातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती आणि अशा गोष्टीला तुम्हाला गांभीर्यानेच घ्यावं लागतं. गेल्या वर्षीपेक्षा हे वर्ष खूपच बरं आहे. पण आम्हाला लग्नसोहळ्यात प्रत्येक गोष्टीबद्दल बारकाईने काळजी घ्यावी लागली. राजस्थानमध्ये लग्न खूप छान पद्धतीने पार पडला आणि आम्ही दोघं खूप खूश आहोत.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिना आणि विकी लवकरच एकत्र झळकणार आहेत. एका जाहिरातीत ही जोडी एकत्र दिसणार आहे. वांद्रे इथल्या मेहबूब स्टुडिओमध्ये या जाहिरातीसाठी दोघांनी एकत्र शूट केलं. विकी आणि कतरिनाने गुरुवारी सलमान खानची बहीण अर्पिता खानच्या घरी हजेरी लावली. अर्पिताच्या घरातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी ही जोडी पोहोचली होती. यावेळी सलमान खान, रितेश देशमुख, सोहैल खान, इसाबेल कैफ, वरुण शर्मा आणि इतर सेलिब्रिटींनाही अर्पिताच्या घरी पाहिलं गेलं.

कतरिना लवकरच ‘भूत पोलीस’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत इशान खट्टर आणि सिद्धार्थ चतुर्वेदी यांच्या भूमिका आहेत. याशिवाय ती सलमान खानसोबत ‘टायगर 3’मध्येही दिसणार आहे. कतरिना आणि विजय सेतुपतीचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. तर दुसरीकडे विकी कौशलचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.