नीतू कपूर यांना रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला टोमणा मारणे पडले महागात, थेट कतरिना कैफच्या आईने घेतला समाचार

नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि त्या अचानक नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. सतत सोशल मीडियावर नीतू कपूर यांना टार्गेट केले जात आहे. त्याचे कारणही तेवढे मोठे आहे. नीतू कपूर यांची पोस्ट बऱ्याच लोकांना आवडली नाहीये.

नीतू कपूर यांना रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला टोमणा मारणे पडले महागात, थेट कतरिना कैफच्या आईने घेतला समाचार
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:16 PM

मुंबई : 14 एप्रिल 2022 रोजी अचानक सर्वांना मोठा धक्का देत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट यांनी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे नोव्हेंबरमध्येच आलिया भट्ट हिने एका गोंडस मुलीला जन्म देखील दिला. आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले. आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या मुलीच्या नावाची घोषणा करत थेट तिच्या नावाचा अर्थही सांगून टाकला. आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी रणबीर कपूर याने अगोदर दीपिका पादुकोण आणि नंतर कतरिना कैफ (Katrina Kaif) यांना डेट केले होते. विशेष म्हणजे कतरिना आणि रणबीर तर सहा ते सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

रणबीर कपूर याची आई नीतू कपूर या प्रचंड चर्चेत आहेत. त्याचे कारणही तेवढे मोठे नक्कीच आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केल्याने नीतू कपूर या चर्चेत आल्या. नुसत्या चर्चेतच नाही तर अनेकांनी या पोस्टनंतर नीतू कपूर यांना ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये. नेटकरी हे नीतू कपूर यांना खडेबोल सुनावताना दिसले.

katrina kaif

नीतू कपूर यांनी त्यांच्या हा पोस्टमधून कतरिना कैफ हिला टोमणा मारल्याची चर्चा होती. नीतू कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केले म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्यासोबत लग्न करणार आहे. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत, असे नीतू कपूर यांनी आपल्या पोस्टमध्ये शेअर केले.

नीतू कपूर यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला. कतरिना कैफ हिलाच हा टोमणा मारल्याचा अंदाज वर्तवला जात होता. अनेकांनी नीतू कपूर यांना खडेबोल सुनावले. मुलाला चुकीचे संस्कार देत असल्याचा आरोपही अनेकांनी नीतू कपूर यांच्यावर केला. आता यावर कतरिना कैफ हिच्या आईने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

katrina kaif

नुकताच कतरिना कैफ हिच्या आईने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, माझे पालनपोषण अशा प्रकारे झाले आहे की, मी सफाई कर्मचार्‍यांना तोच आदर देते, जो सीईओला दिला जातो. आता कतरिना कैफ हिच्या आईची ही पोस्ट व्हायरल होताना दिसतंय. अनेकांनी कतरिना कैफ हिच्या आईच्या पोस्टला सपोर्ट देखील केलाय. या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट देखील केल्या जात आहेत.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.