विकी कौशल-कतरिना कैफ यांचा साखरपुडा झाला? पाहा अभिनेत्रीची टीम काय म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) बुधवारी पूर्ण दिवसभर चर्चेत होते की, या दोन्ही कलाकारांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर बऱ्याच बातम्या चर्चेत आल्या होत्या की, दोघांनीही त्यांचे नाते आता पुढे नेले आहे, पण आता या दोघांनी लग्न केले नसल्याची बातमी समोर आली आहे.

विकी कौशल-कतरिना कैफ यांचा साखरपुडा झाला? पाहा अभिनेत्रीची टीम काय म्हणाली...
कतरिना-विकी
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 10:47 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) बुधवारी पूर्ण दिवसभर चर्चेत होते की, या दोन्ही कलाकारांनी गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर बऱ्याच बातम्या चर्चेत आल्या होत्या की, दोघांनीही त्यांचे नाते आता पुढे नेले आहे, पण आता या दोघांनी लग्न केले नसल्याची बातमी समोर आली आहे.

दिवसभर सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये त्यांच्या रोमान्सची चर्चा होत होती. काही माध्यमांच्या अहवालात असा दावा करण्यात आला होता की, दोघांचाही एक छोटासा रोका सेरेमनी पार पडला आहे आणि आता ते अधिकृतपणे नात्यात अडकले आहेत. मात्र, ही बातमी केवळ अफवा ठरली आहे.

अभिनेत्रीच्या टीमचे अधिकृत स्टेटमेंट

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

कतरिना कैफ आणि विकीने त्यांच्या साखरपुड्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली नाही. परंतु अभिनेत्रीच्या टीमकडून एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. प्रवक्त्यांच्या मते, कोणताही रोका सोहळा झालेला नाही आणि कतरिना लवकरच ‘टायगर 3’ च्या शूटिंगसाठी रवाना होणार आहे.

कतरिनाने तिचा कथित प्रियकर विकी कौशल याच्याशी वांद्रे येथील निवासस्थानी साखरपुडा उरकल्याची अफवा पसरली असताना, पिंकविलाला विशेष माहिती मिळाली की, त्यावेळी अभिनेत्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर सलमान खानसोबत होती. रात्री त्यांचे रशियाला उड्डाण होते. परंतु, काही कारणांमुळे त्यांना विमान रद्द करावे लागले आणि आता दोघेही लवकरच टायगर 3च्या शूटसाठी पुन्हा रशियाला उड्डाण करतील.

‘शेर शाह’ च्या स्क्रिनिंगमध्ये दिसली जोडी

अलीकडेच हे दोन्ही कलाकार ‘शेरशाह’ च्या स्क्रिनिंगवर स्पॉट झाले होते. मात्र, विशेष बाब म्हणजे हे दोघेही माध्यमांचा कॅमेरा टाळताना दिसले. पण तरीही दोघे एकत्र दिसले होते. विकी बऱ्याचदा कतरिनाच्या इमारतीच्या खाली दिसतो. दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर कोणत्याही प्रकारचा शिक्कामोर्तब केलेला नाही, पण असे म्हटले जात आहे की दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात.

कतरिना कैफ आणि विक्की कौशल दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहेत. विकी कौशलकडे सध्या आदित्य धरचा ‘अश्वत्थामा’ आहे, तर कतरिना कैफ सलमान खानसोबत टायगर 3च्या शूटिंगसाठी रशियाला जात आहे.

(Katrina Kaif’s team release statement over Actress Engagement with Vicky Kaushal)

हेही वाचा :

‘तिची एक गोड तक्रार आणि थेट एक गुलाब नव्हे तर गुलाबांचा वर्षाव..’, ‘मन उडू उडू झालं’मध्ये रंगणार रोमान्सचा खेळ!

अमोल पालेकर आणि रिंकू राजगुरूचा “200 – हल्ला हो” हिंदी आणि मराठीतही; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.