Khoya Khoya Chand | फिल्म इंडस्ट्रीचा निरोप घेऊन राजकारणात प्रवेश, आता कर्करोगाशी झुंज देतेय अभिनेत्री किरण खेर

बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, जे केवळ एक उत्तम कलाकारच नाहीत, तर एक चांगले राजकारणी देखील आहेत. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत बरेच नाव कमावले आहे आणि आता राजकारणातही नाव कमावत आहेत.

Khoya Khoya Chand | फिल्म इंडस्ट्रीचा निरोप घेऊन राजकारणात प्रवेश, आता कर्करोगाशी झुंज देतेय अभिनेत्री किरण खेर
किरण खेर
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 8:42 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, जे केवळ एक उत्तम कलाकारच नाहीत, तर एक चांगले राजकारणी देखील आहेत. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत बरेच नाव कमावले आहे आणि आता राजकारणातही नाव कमावत आहेत. आज खोया खोया चांदमध्ये आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सध्या राजकारणात कार्यरत आहेत. आज आपण अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सध्या रक्त कर्करोगाशी झुंज देत आहे.

पंजाबमध्ये जन्मलेल्या किरण खेर यांनी चंडीगडमधून पदवी संपादन केली. अभ्यासादरम्यान किरणचा कल अभिनयाकडे होता. पदवीनंतर त्या चंदीगडमधील थिएटरमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘आसरा प्यार’ या पंजाबी चित्रपटातून केली. यानंतर तिने ‘सरदारी बेगम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आईच्या भूमिकेने जिंकले हृदय

किरण खेरने बर्‍याच चित्रपटात आईची भूमिका साकारली आहे. संजय लीला भन्साळीच्या ‘देवदास’मध्ये किरणने ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका साकारली होती. या पात्राने त्यांना बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली. यानंतर, ‘वीर-झारा’, ‘ओम शांती ओम’, ‘हम-तुम’, ‘रंग दे बसंती’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये त्या आईच्या भूमिकेत दिसल्या आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांकडून त्यांना खूप प्रेम मिळालं.

टीव्ही इंडस्ट्रीमध्येही केले काम

बॉलिवूडशिवाय किरण खेर यांनी टीव्ही इंडस्ट्रीमध्येही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ‘प्रतिमा’, ‘गुब्बारे’, ‘इसी बहाने’ या सारख्या डेली सोपमध्ये काम केले. या व्यतिरिक्त त्यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुराही सांभाळली आहे.

राजकारणात कमावले नाव

मनोरंजन विश्वात नाव कमावल्यानंतर किरण खेर यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. तर, 2019 मध्ये किरण खेर चंदीगडमधून लोकसभा निवडणूक लढल्या आणि जिंकल्या.

रक्ताच्या कर्करोगाशी झुंज

किरण खेर सध्या रक्ताच्या कर्करोगाशी लढा देत आहे. किरण खेर यांचे पती अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या तब्येतीची अपडेट देत असतात. किरणच्या मुलाने देखील अलीकडेच आपल्या व्हिडीओमध्ये किरण खेर यांची एक झलक दाखवली होती.

(Khoya Khoya Chand Entering politics after saying goodbye to the film industry, actress Kiran Kher is now battling cancer)

हेही वाचा :

ज्या महागड्या लिपस्टिकमुळे आला होता चोरीचा आळ, त्याच ब्रँडने प्रोडक्ट लाँचची विनंती केली! वाचा अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा किस्सा

दिलीप कुमारांमुळे मनोज कुमार यांनी बदलले नाव, चित्रपट विश्वातून निर्माण केली स्वतःची नवी ओळख!

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.