Khoya Khoya Chand | पहिल्याच चित्रपटाने रातोरात बनवले स्टार, पाहा आता काय करतोय अभिनेता विवेक मुशरान…

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स होते, ज्यांनी एके काळी चाहत्यांची मने जिंकली, पण मोठ्या स्टार्सच्या यादीत त्यांचे नाव कधीच बसले नाही. त्यात बॉलिवूड अभिनेता विवेक मुशरानच्या नावाचाही समावेश आहे. 9 ऑगस्ट 1969 रोजी जन्मलेल्या विवेक मुशरान यावर्षी आपला 52वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Khoya Khoya Chand | पहिल्याच चित्रपटाने रातोरात बनवले स्टार, पाहा आता काय करतोय अभिनेता विवेक मुशरान...
विवेक मुशरान
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 9:59 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स होते, ज्यांनी एके काळी चाहत्यांची मने जिंकली, पण मोठ्या स्टार्सच्या यादीत त्यांचे नाव कधीच बसले नाही. त्यात बॉलिवूड अभिनेता विवेक मुशरानच्या नावाचाही समावेश आहे. 9 ऑगस्ट 1969 रोजी जन्मलेल्या विवेक मुशरान यावर्षी आपला 52वा वाढदिवस साजरा करत आहेत. विवेकने ‘सौदागर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटाद्वारे तो लोकांच्या नजरेत आला होता. त्याचा निरागस चेहरा, गोड हास्य आणि निरागस डोळ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

विवेक मुशरान आता काय करतोय?

‘सौदागर’नंतर त्याला एकापाठोपाठ अनेक चित्रपटही मिळाले, पण तो इतर स्टार्ससारखा सुपरहिट हिरो बनू शकला नाही. काही काळानंतर त्याचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि तो मोठ्या पडद्यापासून दूर गेला. तथापि, मोठ्या पडद्याबरोबरच त्याने छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची जादू दाखवली.

‘सौदागर’ चित्रपटात भूमिका मिळाली तेव्हा विवेक अवघ्या 21 वर्षांचा होता. या चित्रपटात राजकुमार आणि दिलीप कुमार यांच्या सारखे दिग्गज कलाकार होते. पण, तरीही विवेकने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात त्याच्या आणि मनीषा कोईरालावर चित्रित केलेले ‘इलू-इलू’ हे गाणे प्रचंड गाजले.

चित्रपट होऊ लागले फ्लॉप!

सौदागरनंतर विवेक ‘सातवाँ आसम’, ‘बेवफा से वफा’ आणि ‘रामजाने’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसला. त्या काळात त्याने अनेक मोठ्या नायिकांसोबत काम केले. पण हळूहळू त्यांचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि तो चित्रपटांमधून गायब होऊ लागला. काही वर्ष तो चित्रपटांपासून दूर राहिला पण 2000 साली त्याने ‘अंजाने’ चित्रपटातून पुनरागमन केले. यानंतरही तो यशस्वी होऊ शकला नाही.

या व्यतिरिक्त, विवेकने ‘दीताब’, ‘छोटा सा घर’, ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’, ‘बात हमारी पक्की है’सारख्या अनेक चित्रपट आणि शोमध्ये दिसला. तसेच ‘सोन परी’, ‘निशा और उसके कझिन’, ‘परवरीश’ सारख्या हिट शोमध्ये दिसले. एकेकाळी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या विवेकने लवकरच चित्रपट आणि टीव्हीमध्ये सहाय्यक भूमिका साकारण्यास सुरुवात केली.

अनेक चित्रपटांमधून केले काम!

त्यांनी ‘तमाशा’, ‘पिंक’, ‘बेगम जान’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ मध्येही काम केले. विवेकने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. तो ‘मर्जी’, ‘नेव्हर किस योर बेस्ट फ्रेंड’, ‘द हार्टब्रेक हॉटेल’ आणि ‘बँड’ सारख्या अनेक वेब सीरीजमध्ये दिसला आहे. विवेकचा लूकही आता खूप बदलला आहे, पण तो अजूनही मनोरंजन विश्वात सक्रिय आहे.

हेही वाचा :

ऑडीओ बुकच्या माध्यमातून पुन्हा ऐकता येणार लालन सारंग आणि विनय आपटेंचा आवाज!

ध्यानी मनी नसलेली धून दलेर मेहंदीनी गाण्याला लावली आणि सुपरहिट ठरलं आमिर खानचं ‘Rang De Basnti’!

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.