Khoya Khoya Chand | पहिल्याच चित्रपटात शाहरुख खानसोबत रोमान्स, पाहा आता काय करते अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती
बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh khan) 'कभी हा कभी ना' (Kabhi Haan Kabhi Naa) या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamoorthi) हिने आपल्या सौंदर्याने लाखों प्रेक्षकांची मने जिंकली.
मुंबई : बॉलिवूडचा ‘रोमान्स किंग’ अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh khan) ‘कभी हा कभी ना’ (Kabhi Haan Kabhi Naa) या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (Suchitra Krishnamoorthi) हिने आपल्या सौंदर्याने लाखों प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, तिची जादू चित्रपटांमध्ये फार काल चालू शकली नाही.
सुचित्रा कृष्णमुर्तीने 1991मध्ये मल्याळम चित्रपट ‘किलकुम्पेट्टी’ (kilukkampeti) मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती तामिळ चित्रपट ‘शिवरंजनी’मध्ये (Sivaranjani) दिसली होती. मात्र, सुचित्राला तिची खरी ओळख ‘कभी हा कभी ना’ या चित्रपटातून मिळाली. सुचित्राचा हा पहिला वहिला हिंदी चित्रपट होता. अभिनेत्री सुचित्रा कृष्णमुर्ती केवळ अभिनेत्रीच नाही, तर गायिका देखील आहे. 1990च्या दशकात तिने आपल्या गायन कारकीर्दीची सुरूवात केली. सुचित्रा यांनी चित्रपटांसाठी जे नियोजन केले होते, तिला जबरदस्त प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, या दरम्यान त्यांची भेट दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांच्याशी झाली. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
वयातील अंतर आले चर्चेत!
जेव्हा सुचित्रा आणि शेखरचे लग्न झाले, तेव्हा दोघेही खूप चर्चेत होते. दोघांच्या वयामध्ये तब्बल 30 वर्षांचे अंतर होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्यामध्ये वयाचे अंतर येऊ दिले नाही आणि या सर्व गोष्टी सोडून दोघांनीही लग्न केले.
फार काळ टिकला नाही संसार
शेखर आणि सुचित्रा दोघांचे प्रेम फार काळ टिकले नाही आणि लग्नाच्या 10 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. दोघांनी 1997मध्ये लग्न केले आणि 2006 मध्ये दोघे ते वेगळे झाले. लग्नानंतर सुचित्राने स्वतःला कामापासून दूर केले होते. मात्र, नंतर ती पुन्हा अभिनय विश्वात परतली. तिने पुन्हा काही हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला, पण त्यानंतर सुचित्राने 2010 ‘मित्तल वर्सेस मित्तल’ या चित्रपटानंतर तिने पुन्हा मोठा ब्रेक घेतला. त्यानंतर ती 2019 मध्ये ‘रोमियो अकबर वॉल्टर’ चित्रपटात दिसली होती.
बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी मिळालेला ‘हा’ सल्ला
सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, एका टॅलेंट एजन्सीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेने तिला सांगितले की, बॉलिवूडमध्ये परत येण्यासाठी तुला पुन्हा प्रकाशझोतात यावे लागेल. यासाठी तू करण जोहरच्या पार्टीत जा. मात्र, तिने हा प्रस्ताव धुडकावून लावला होता. सुचित्रा सध्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे आणि सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.
(Khoya Khoya Chand Romance with Shah Rukh Khan in the very first film, see what actress Suchitra does now)
हेही वाचा :
Madhuri Dixit : धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
Taapsee Pannu Networth: कोट्यवधींच्या मालमत्तेची मालकीण आहे तापसी पन्नू, मुंबईत आहे आलिशान घर