Khoya Khoya Chand | अभिनयात जम बसवता आला नाही म्हणून निर्माता बनला, आता ओळखूही येत नाही ‘तुम बिन’चा ‘हा’ अभिनेता!

मनोरंजन विश्वात बरेच लोक आले आणि निघून देखील गेले. काहींनी नाव कमावले, तर काहींनी दुसरे मार्ग निवडले. तथापि, असे काही लोक होते ज्यांनी अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, परंतु जेव्हा अभिनयात जम बसला नाही तेव्हा ते दिग्दर्शक किंवा निर्माता झाले.

Khoya Khoya Chand | अभिनयात जम बसवता आला नाही म्हणून निर्माता बनला, आता ओळखूही येत नाही ‘तुम बिन’चा ‘हा’ अभिनेता!
हिमांशू मलिका
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 9:41 AM

मुंबई : मनोरंजन विश्वात बरेच लोक आले आणि निघून देखील गेले. काहींनी नाव कमावले, तर काहींनी दुसरे मार्ग निवडले. तथापि, असे काही लोक होते ज्यांनी अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, परंतु जेव्हा अभिनयात जम बसला नाही तेव्हा ते दिग्दर्शक किंवा निर्माता झाले, परंतु तरीही त्यांना यश मिळू शकले नाही. आज आपण ‘खोया खोया चांद’मध्ये ज्या अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत, तो बरीच स्वप्ने घेऊन मुंबईतही आला होता. अभिनेता म्हणून चमकता आले नाही तेव्हा तो निर्माता बनला. या अभिनेत्याचे नाव आहे हिमांशू मलिक (Himanshu Malik).

हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असलेला हिमांशु मलिक हा जाट कुटुंबातील आहेत. तो विवाहित असून, त्याला दोन मुलेही आहेत. आजघडीला तो मुंबईत आपल्या कुटूंबासह राहतो. हिमांशु मलिकने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगच्या माध्यमातून केली होती. 1996 च्या ‘कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिमांशूला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या चार वर्षांनंतर हिमांशूला आणखी एक चित्रपट मिळाला. त्या चित्रपटाचे नाव ‘जंगल’ होते. या दोन्ही चित्रपटांमधून हिमांशूला विशेष ओळख मिळाली नाही.

‘तुम बिन’मधून ओळख मिळाली, पण करिअरची गाडी काही चालली नाही!

यानंतर हिमांशुला 2001मध्ये ‘तुम बिन’ या चित्रपटातून सर्वात मोठा ब्रेक मिळाला. हिमांशूने या चित्रपटात ‘अभिज्ञान’ची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरला. या चित्रपटाच्यानंतर हिमांशूसमोर चित्रपटांची रांग लागली होती. 2003मध्ये आलेल्या ‘ख्वाहिश’ या चित्रपटाने हिमांशूची एका साध्या मुलाची प्रतिमा मोडीत काढली आणि मल्लिका शेरावत हिच्यासोबत या चित्रपटात बरेच बोल्ड सीन देऊन हायलाईट केले.

‘तुम बिन’ व ‘ख्वाहिश’च्या यशानंतर हिमांशुने ‘एलओसी कारगिल’, ‘रख्त’, ‘रोग’, ‘रेन’, ‘कोई आपसा’, ‘सजनी’, ‘यमला पगला दीवाना’ अशा काही निवडक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. तो शेवटच्या वेळी 2018च्या ‘3 स्टोरी’ या चित्रपटात दिसला होता. तथापि, काही चित्रपट वगळता उर्वरित चित्रपटांमध्ये त्याचे नशीब चमकू शकले नाही आणि हिमांशूने अभिनेता म्हणून इंडस्ट्रीपासून दूर जाणे पसंत केले.

सध्या हिमांशु मलिक निर्माता म्हणून इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत, पण त्याच्या निर्मित चित्रपटांना काही विशेष यश मिळालेले नाही. हिमांशुच्या कारकिर्दीतच नव्हे तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही बदल झाला आहे. ‘तुम बिन’चा तो चॉकलेट बॉय इतका बदलला आहे की, आता त्याला ओळखणे देखील कठीण झाले आहे. हिमांशूच्या डोक्यावरून केस उडाले आहेत आणि त्याचे वजन देखील खूप वाढले आहे. जर, त्याला आता पाहिले तर त्याला कोणी ओळखू देखील शकणार नाही.

(Khoya Khoya Chand Tum Bin Fame Actor Himanshu Malik became a producer as he could not concentrate on acting)

हेही वाचा :

Love Story | विक्रांत मेस्सी इतकीच साधी आणि शांत आहे त्याची होणारी पत्नी, वेब सीरीजमध्ये झळलीय ही जोडी!

चित्रपटाच्या सेटवर झाली होती संजय आणि मान्यता दत्तची पहिली भेट, वाईट काळातही दिली एकमेकांना भक्कम साथ!

'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.