Khoya Khoya Chand | कधीकाळी होते ऋषी कपूरचा आवाज, आता कुठे गायब झालेयत गायक शैलेंद्र सिंह?
ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना आवाज दिल्याने प्रसिद्ध झालेले शैलेंद्र सिंह (Shailendra Singh) यांना चाहते कधीही विसरू शकत नाहीत. शैलेंद्र यांनी नेहमीच आपल्या आवाजाने सर्वांना वेड लावले. त्यांचे ‘बॉबी’ चित्रपटातील गाणी चाहते कधीही विसरू शकत नाहीत.
मुंबई : ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना आवाज दिल्याने प्रसिद्ध झालेले शैलेंद्र सिंह (Shailendra Singh) यांना चाहते कधीही विसरू शकत नाहीत. शैलेंद्र यांनी नेहमीच आपल्या आवाजाने सर्वांना वेड लावले. त्यांचे ‘बॉबी’ चित्रपटातील गाणी चाहते कधीही विसरू शकत नाहीत. शैलेंद्र यांनी ही गाणी स्वतःच्या आवाजाने सजवली होती. मात्र, आजमितीला हा अतुलनीय गायक कुठे आहे, हे कोणालाही माहित नाही.
शैलेंद्रला बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून करिअर करायचे होते. पण नशिबाने त्यांना अभिनेत्याऐवजी गायक बनवले. त्यांना गाण्यात ते यश मिळाले, जे प्रत्येकाला मिळणे कठीण आहे. शैलेंद्र या विश्वातून कसे गायब झाले, हे आपण जाणून घेणार आहोत.
आईने गाण्यासाठी पाठवले होते!
शैलेंद्रला जरी अभिनयात करिअर करायचे होते, पण विशेष गोष्ट म्हणजे शैलेंद्र दरवर्षी गायन आणि अभिनयात ट्रॉफी जिंकत असे. यामुळेच त्यांच्या आईने शैलेंद्रला उस्ताद छोटे इक्बाल यांच्याकडे संगीत प्रशिक्षणासाठी पाठवायला सुरुवात केली.
कसे मिळाले पहिले गाणे?
अभिनेता राज कपूर यांच्यासाठी स्क्रिप्ट लिहिणारे व्हीपी साठे हे शैलेंद्र सिंह यांच्या वडिलांचे मित्र होते. एकदा त्यांनी सांगितले की, राज कूपर आपला धाकटा मुलगा ऋषी याला लाँच करणार आहे आणि यासाठी तो एक गायक शोधत आहे, जो ऋषीचा आवाज बनू शकेल. अशा वेळी साठे यांनी शैलेंद्र सिंह यांचे गाणे अनेक वेळा ऐकले होते, त्यांनी शैलेंद्रची ओळख राज कपूर यांच्याशी करून दिली. यानंतरच ते ऋषी कपूरचा आवाज बनले.
कसे बनले ऋषी कपूरचा आवाज?
‘बॉबी’ चित्रपटाची गाणी गाऊन शैलेंद्र रातोरात सुपरस्टार गायक बनले. विशेष गोष्ट अशी की, आजपर्यंत इतर कोणत्याही गायकाला त्यांच्यासारखा आवाज कॉपी करता आला नाही. त्यांनी ‘हमने तुमको देखा तुम हमको देखा’ (खेल खेळ मे), ‘होगा तुमसे प्यार कौन’ (जमाने को दिखाना है), ‘तुमको मेरे दिल ने’ (रफूचक्कर), ‘कई दिनसे मुझे कोई सपनो में’ (आँखियों के झरोखो से) सारखी गाणी गायली आहेत.
अभिनयातही आजमावले नशीब
शैलेंद्रला जरी गायनात विशेष यश मिळाले असले, तरी अभिनेता होण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती. हेच कारण आहे की, एकदा ‘दो जासूस’ चित्रपट बनवला जात होता, निर्मात्यांना त्या चित्रपटात नवीन चेहऱ्याची गरज होती. हा चित्रपट शैलेंद्र यांना राजेंद्र कुमार यांनी दिला होता. शैलेंद्र यांचे त्या चित्रपटातील कामाचे खूप कौतुक झाले आणि त्यानंतरही ते काही चित्रपटांमध्ये दिसले. पण, शैलेंद्र यांना सतत गाण्यांच्या ऑफर येत होत्या.
करिअरला लागली उतरती कळा!
शैलेंद्र सिंह अशी व्यक्ती होते, ज्यांनी अनेक नवीन संगीतकारांना संधी दिली. पण यश मिळाल्यानंतर त्याच लोकांनी शैलेंद्र यांना गाण्याची संधी कधीच दिली नाही. त्यांची गायन कारकीर्द 1973पासून सुरू झाली आणि 1987पर्यंत त्यांची कारकीर्द उतरणीला लागली होती. या छोट्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 75 चित्रपटांमध्ये आपला आवाज दिला.
शैलेंद्रबद्दल पसरली अफवा
शैलेंद्र यांची कारकिर्दी जरी उतरणीला लागली असली, तरी त्यांनी कधीही कोणाकडून मदत घेतली नव्हती. याच काळात शैलेंद्र सिंह यांचे हृदयाचे ऑपरेशन झाले आणि आता ते गाणी गाऊ शकत नाहीत अशी अफवा पसरवली गेली. मात्र, हळूहळू कालांतराने शैलेंद्र यांना काम मिळणे बंद झाले. आजमितीला शैलेंद्र सिंह एकदम तंदुरुस्त आहेत, पण तरीही त्यांना काम मिळत नाहीय आणि तो विस्मृतीत आयुष्य जगत आहेत.
(Khoya Khoya Chand Where is famous singer Shailendra Singh now)
हेही वाचा :
Bigg Boss OTT | ‘बिग बॉस’च्या आलिशान घरात जाताच बदलला ‘भोजपुरी क्वीन’ अक्षराचा लूक!