नेपोटीझमच्या टीकेची भीती, बॉलिवूड एंट्रीपूर्वीच खुशी कपूर ‘अभिनय शाळेत’ दाखल!

श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूरची (Boney Kapoor) मोठी मुलगी जाह्नवी कपूरने (Janhvi Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तिच्या जबरदस्त अभिनयामुळे तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

नेपोटीझमच्या टीकेची भीती, बॉलिवूड एंट्रीपूर्वीच खुशी कपूर 'अभिनय शाळेत' दाखल!
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 4:13 PM

मुंबई : श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूरची (Boney Kapoor) मोठी मुलगी जाह्नवी कपूरने (Janhvi Kapoor) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तिच्या जबरदस्त अभिनयामुळे तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि सध्या जाह्नवीच्या हातात बरेच चित्रपट आहेत. जाह्नवी कपूरनंतर आता तिची बहीण खुशी कपूरही लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. अशी एक चर्चा सर्वत्र रंगली आहे की, बोनी कपूर यांनी यापूर्वीच खुशीला लॉन्च करण्यासाठी अनेक निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. आता हे जवळपास निश्चित झाले आहे की, खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. पण त्यापूर्वी ती अभिनय शिकत आहे. (Khushi Kapoor went to America to learn acting)

खुशी अभिनय शिकण्यासाठी अमेरिकेला गेली आहे आणि ती परत येताच एखाद्या मोठ्या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. नेपोटीझमच्या टीकेची भीतीमुळे बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर ती अभिनय शिकत आहे असे म्हटल जात आहे. खुशीची फॅन फॉलोइंगही एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. सोशल मीडियावर कोट्यावधी लोक खुशीली फाॅलो करतात. बॉलिवूड हंगामाच्या मते, खुशी कपूर वर्ष 2022 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश करू शकते. खरं तर, बोनी कपूरची इच्छा आहे की खुशीने करिअर सुरू करण्यापूर्वी पूर्ण प्रशिक्षण घ्यावे.

बोनी कपूर यांना खुशीच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण विषयी विचारले गेले होते. तेव्हा ते म्हणाले होते की, हो खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून आपल्याला लवकरच तिच्या चित्रपटाबद्दल ऐकायला मिळेल. पण त्यावेळी बोनी कपूर यांना हेही स्पष्ट केले की, त्यांचे प्रॉडक्शन हाऊस खुशीली लाँच करणार नाही. जाह्नवी आणि अर्जुन कपूर देखील बोनी कपूरच्या प्रॉडक्शन हाऊसने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले नव्हते. निर्माता बोनी कपूर यांनाही आता अभिनयाच्या जगात प्रवेश केला आहे. ते अनिल कपूरच्या AK Vs AK मध्ये दिसले होते आणि आता रणबीर श्रद्धा कपूरच्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Thank you Note | वरुण-नताशाचा थाटात लग्नसोहळा, लग्नानंतर फॅन्ससाठी खास मेसेज शेअर!

कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन, कंगना म्हणते ‘मोदीजी कायदे त्वरित लागू करा…!’

(Khushi Kapoor went to America to learn acting)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.