कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाविषयी मित्राने केला धक्कादायक खुलासा
करण जोहरच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी कियारा आणि शाहिद कपूर आले होते.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सतत चर्चा आहेत की, कियारा आणि सिद्धार्थ लवकरच लग्न बंधणात अडकणार आहेत. चाहतेही यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कियारा आणि सिद्धार्थच्या जोडीला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळते आहे. करण जोहरच्या शोमध्ये काही दिवसांपूर्वी कियारा आणि शाहिद कपूर आले होते. त्यावेळी शाहिदने सांगितले होते की, नव्या वर्षामध्ये कियारा तुम्हाला सर्वांना खूप मोठे गिफ्ट देणार आहे. विशेष म्हणजे हे तिच्या चित्रपटाविषयी नसून खासगी आयुष्याबद्दलचे आहे, तेंव्हापासूनच कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत.
जानेवारी महिन्यामध्ये कियारा आणि सिद्धार्थ लग्न करणार असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये आहेत. मात्र, नुकताच या दोघांच्या अत्यंत जवळच्या मित्राने यांच्या लग्नाविषयी मोठी अपडेट दिली आहे.
कियारा अडवाणी तिच्या करिअरमध्ये अत्यंत महत्वाच्या टप्प्यामध्ये आहे. कियाराला वाटते की, लग्न झाल्यावर कुठेतरी यासर्व गोष्टी मागे पडतील. यामुळे सध्यातरी कियाराने लग्नाचा विषय बाजूला ठेवला असल्याचे तिच्या मित्राने सांगितले आहे.
दोघांपैकी कोणीही लग्नाविषयी विचार करत नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे. लग्नानंतर कियाराच्या करिअरला ब्रेक लागू शकतो असेही कियाराला वाटत असल्याचे तिच्या मित्राने सांगितले आहे.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या चाहत्यांना या दोघांच्या लग्नासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. कियारा गोविंदा नाम मेरा या चित्रपटात लवकरच दिसणार असून या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत आहे.