Kiara Advani: ‘तू बाते तो बडी बडी करता था, लेकिन तू भी..’, सिद्धार्थ मल्होत्रासाठी कियाराची अजब पोस्ट

तिची ही पोस्ट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. या दोघांमध्ये काही बिनसलं का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला.

Kiara Advani: 'तू बाते तो बडी बडी करता था, लेकिन तू भी..', सिद्धार्थ मल्होत्रासाठी कियाराची अजब पोस्ट
Kiara Advani and Sidharth MalhotraImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 3:18 PM

अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) इन्स्टा स्टोरीमध्ये बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासाठी (Sidharth Malhotra) अजब पोस्ट लिहिली आहे. ‘सिद्धार्थ, तू बाते तो बडी बडी करता था, लेकिन तू भी ‘आऊट ऑफ साइट, ऑऊट ऑफ माईंड’ टाईप का बंदा निकला’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. तिची ही पोस्ट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावरून नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. या दोघांमध्ये काही बिनसलं का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. काही दिवसांपूर्वीच कियारा आणि सिद्धार्थ हे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी परदेशी फिरायला गेले होते. कियाराच्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमातही सिद्धार्थने हजेरी लावली होती. मात्र त्यापूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही (Break Up) चर्चा होत्या.

कियारा आणि सिद्धार्थ यांनी ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाला वर्ष पूर्ण झालं असून त्यानिमित्त कियाराने अशी पोस्ट लिहिली असावी असा अंदाज काही नेटकऱ्यांनी वर्तवला. कियाराचा हा पब्लिसिटी स्टंट असावा, असं ते म्हणाले. कियारा आणि सिद्धार्थ ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी आहे. अनेकदा या दोघांच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सोशल मीडियावर चर्चा होत असतात. मात्र या दोघांनी त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

हे सुद्धा वाचा

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

ब्रेकअपच्या चर्चांवर नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कियारा म्हणाली होती, “मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. जरी मी काही बोलत नसले तरी लोक त्याबद्दल चर्चा करत आहेत, लिहित आहेत. जेव्हा मी खरंच बोलेन तेव्हा नेमकं काय होईल काय माहित? जेव्हा मला ठीक वाटेल तेव्हा मी यावर नक्की बोलेन. सध्या मी एवढंच सांगू शकते मी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात खुश आहे.”

‘शेरशाह’ या चित्रपटातील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून या दोघांना आणखी एका रोमँटिक ड्रामाची ऑफर देण्यात आल्याचं कळतंय. कियारा आणि सिद्धार्थला त्याची पटकथा आवडली असून अद्याप त्यांनी तो साइन केला नाहीये. पण भविष्यात ही जोडी पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र झळकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...