केवळ एक पात्र साकारायचे नव्हते म्हणून किशोर कुमारांनी चक्क मुंडण केले! वाचा किस्सा…
कवी आणि गीतकार गुलजार यांनी किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी किशोर कुमार यांनी कसे अचानक टक्कल केले होते, ते त्यांनी सांगितले.
मुंबई : कवी आणि गीतकार गुलजार यांनी किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी किशोर कुमार यांनी कसे अचानक टक्कल केले होते, ते त्यांनी सांगितले. वास्तविक, किशोर कुमार यांनी अचानक असे करण्याचे कारण म्हणजे त्यांना या चित्रपटातील नायकाची भूमिका स्कारायची नव्हती. गुलजार यांनी त्यांच्या ‘अॅक्चुअली … आय मेट देम: अ मेमॉयर’ या पुस्तकात याचा तपशीलवार उल्लेख केला आहे.
पुस्तकात गुलजार यांनी सांगितले आहे की, किशोर कुमार ‘आनंद’ चित्रपटातील नायकाची भूमिका टाळण्यासाठी पूर्णपणे टक्कल केले होते. गुलजार यांनी लिहिले की, किशोर कुमार सुरुवातीला 1971च्या ‘आनंद’ या चित्रपटात अभिनेता राजेश खन्नाऐवजी अभिनय करण्यास तयार होते.
अचानक टक्कल करत दिला मोठ धक्का!
पण चित्रपटाच्या शूटिंगच्या काही दिवस आधी किशोर कुमार पूर्णपणे टक्कल करून घेतले होते. त्यांनी चित्रपटातील त्यांच्या सीनवर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती, ज्यात किशोर कुमार यांना टक्कल पडलेल्या अवस्थेत पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. गुलजार यांनी त्यांच्या पुस्तकात हा किस्सा लिहिला आहे आणि लिहिले आहे की, किशोरदांचे टक्कल पाहून आम्ही सगळेच हादरलो होते! मात्र, किशोर दा नाचत-गात कार्यालयात फिरले आणि चित्रपटाचे दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना विचारले – ‘ऋषी, आता तू काय करशील?’
सुपरहिट ठरला ‘आनंद’
यानंतर राजेश खन्ना यांना आनंद चित्रपटातील भूमिकेसाठी खूप कमी वेळेत निवडण्यात आले. गुलजार यांनी लिहिले आहे की, कदाचित किशोर कुमार यांना हे पात्र साकारण्याची कधीच इच्छा नव्हती. विशेष म्हणजे आनंद हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. या चित्रपटाला 1972 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गुलजार यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, केवळ दिग्दर्शकच नव्हे तर अनेक निर्मातेही किशोर कुमार यांच्या या कृत्याचा बळी ठरले होते. त्यांनी आपल्या निर्मात्यांना अशा प्रकारे अडचणीत टाकले होते.
‘मुडी’ किशोरदा!
गुलजार यांनी लिहिले आहे की, एकदा एक निर्माता किशोर कुमार यांना त्यांच्या घरी भेटायला गेला. पण किशोर कुमार त्यावेळी त्याच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी आपला वॉर्डरोब उघडून आत पाऊल टाकले आणि नंतर गायब झाले. एकदा किशोर कुमार यांनी एका फिल्मी गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान चहा मागितला आणि जेव्हा चहा आला, तेव्हा तो न पिताच ते गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पुढे गेले.
4 ऑगस्ट 1929 रोजी खंडवा येथे जन्मलेले किशोर कुमार, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते आणि गायक होते. ते बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने समृद्ध होते. किशोर कुमार एक अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून त्यांनी उद्योगक्षेत्रात प्रसिद्धी मिळवली. त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. किशोर कुमार 70 आणि 80 च्या दशकातील सर्वात महागडे गायक होते. त्यांनी त्या काळातील सर्व मोठ्या कलाकारांना आपला आवाज दिला. त्यांचा आवाज विशेषतः राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांना खूप आवडला. राजेश खन्ना यांना सुपरस्टार करण्यात किशोर यांचे मोठे योगदान मानले जाते.