Kareena Kapoor Net Worth | बंगले आणि महागड्या गाड्या, पाहा ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे करीना कपूर!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते. करीना तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या बिनधास्त अभिनयासाठीही ओळखली जाते. या अभिनेत्रीने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले असून, तिला चाहत्यांकडून नेहमीच कौतुकाची थाप मिळाली आहे.

Kareena Kapoor Net Worth | बंगले आणि महागड्या गाड्या, पाहा ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे करीना कपूर!
करीना कपूर-खान
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 9:25 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते. करीना तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या बिनधास्त अभिनयासाठीही ओळखली जाते. या अभिनेत्रीने आतापर्यंत तिच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले असून, तिला चाहत्यांकडून नेहमीच कौतुकाची थाप मिळाली आहे. करीनाचे चित्रपट पडद्यावर बक्कळ कमाई करतात. याच कारणामुळे अभिनेत्रीची कमाई आणि मालमत्ता ती सैफपेक्षा अजिबात कमी नाही (Know about b0llywood actress Kareena Kapoor khan Net Worth).

‘रेफ्यूजी’ या चित्रपटाने करिअरची सुरुवात करणारी करीना आजच्या घडीला चित्रपटांसाठी भरमसाठ मानधन आकारते. करीना बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. एकट्या करीनाकडे 413 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये पती सैफ अली खानच्या मालमत्तेचा समावेश नाही.

करीना कपूरचे नेट वर्थ

2014पर्यंत करीनाकडे 74.47 कोटींची संपत्ती होती. करीना चित्रपट, ब्रँड अँडर्समेंट्स, स्टेज शो, टूर्स आणि रेडिओ शो इत्यादी माध्यमातून पैसे कमवते. सध्या करीना कपूरचे नेटवर्थ सुमारे 413 कोटी रुपये आहे. तर, अभिनेत्री वर्षाकाठी अंदाजे 73 कोटी रुपये कमावते.

करीना कपूर खानचे बंगले आणि गाड्या

अभिनेत्री करीना कपूरकडे स्वत:च्या कमाईचे लक्झरी बंगले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, वांद्रे येथील फॉर्च्यून हाईट्समध्ये या अभिनेत्रीचा 4BHK अपार्टमेंट आहे. इतकेच नाही तर, तिचे स्वित्झर्लंडच्या Gstaa येथेही घर असल्याचे म्हटले जाते.

करीना कपूर यांना वाहनांची प्रचंड आवड आहे आणि तिच्याकडे बर्‍याच गाड्या देखील आहेत. ज्यात मर्सिडीज बेंझ एस क्लास या गाडीचा समावेश आहे. या मर्सिडीज बेंझ एस-क्लासची किंमत सुमारे 1.40 कोटी रुपये आहे. तर, तिच्याकडे ऑडी क्यू 7 गाडी देखील आहे, जिची किंमत 93 लाख रुपये आहे. या शिवाय तिच्याकडे रेंज रोव्हर स्पोर्ट एसयूव्ही आणि लेक्सस एलएक्स 470 या जवळपास 2.32 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी करीना कपूर पुन्हा एकदा आई बनली आहे. तिने पुन्हा एकदा मुलाला जन्म दिला आहे. मात्र, अभिनेत्रीने अद्याप आपल्या मुलाचे नाव जाहीर केलेले नाही. करीना शेवट ‘गुड न्यूज’ या चित्रपटात दिसली होती. आता ती आमीर खानसमवेत ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू आहे.

(Know about Bollywood actress Kareena Kapoor Khan Net Worth)

हेही वाचा :

Photo: वह कौन था?… जान्हवी कपूर ‘मिस्ट्री मॅन’सोबत समुद्रावर; सोबतच हॉट फोटो शेअर

Photo : नऊवारी साडी आणि मराठी बाणा, रुपाली भोसलेचं सुंदर फोटोशूट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.