Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्यात ‘हा’ अभिनेता होता रिअल हिरो…

10 ऑगस्ट 2022 रोजी जिममध्ये व्यायाम करताना राजूला हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर पडले. त्यानंतर राजू यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्यात 'हा' अभिनेता होता रिअल हिरो...
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 1:10 PM

मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 41 दिवसांनी राजू यांची प्राणज्योत मावळली. राजू यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलांय. चाहते देखील दु:खात आहेत. राजू यांचा ताप (fever) कमी होत नव्हता. आता राजू हे आपल्यामध्ये नाहीयेत, परंतू आयुष्यभर (Life) राजू यांनी लोकांना पोटधरून हसवले आहे. लोकांना हसवण्यात राजू यांना एक वेगळ्याच आनंद मिळायचा. राजू यांनी वयाच्या 58 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतलांय.

राजू श्रीवास्तव या अभिनेत्याचे मोठे चाहते

राजू श्रीवास्तव हे बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते होते. याच कारणामुळे जेव्हा राजू रूग्णालयात व्हेंटिलेटरवर होते, तेव्हा अमिताभ बच्चन यांचा एक ऑडिओ ऐकवण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांचे डायलॉग लहानपणापासूनच राजू यांना प्रचंड आवडायचे. विशेष म्हणजे राजू हे अमिताभ बच्चन यांना कॉपी करायचे जे प्रेक्षकांना प्रचंड आवडत होते. राजू श्रीवास्तव यांच्या आयुष्यातील रिअल हिरो अमिताभ बच्चन हेच होते.

10 ऑगस्ट 2022 ला जिम करताना आला होताहृदयविकाराचा झटका

10 ऑगस्ट 2022 रोजी जिममध्ये व्यायाम करताना राजूला हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर पडले. त्यानंतर राजू यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, रुग्णालयात दाखल असताना राजू श्रीवास्तव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुरूवातीपासूनच चिंताजनक होती. मात्र, कुटुंबीय आणि चाहते सातत्याने चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.