Box Office Collection | ‘दृश्यम 2’चा बाॅक्स ऑफिसवर धमाका सुरूच, भेडियाची कमाई मंदावली
या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षकांना भेटला नाहीये. भेडियाची सुरूवात चांगली झाली.
मुंबई : अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाल करताना दिसत आहे. रिलीज होऊन 13 व्या दिवशी देखील चित्रपट जोरदार कमाई करतोय. अजूनही बाॅक्स ऑफिसवर दृश्यम 2 चीच जादू कायम आहे. दृश्यम 2 नंतर एका आठवड्याने वरुण धवनचा भेडिया हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षकांना भेटला नाहीये. भेडियाची सुरूवात चांगली झाली. परंतू त्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.
वरुण धवनच्या भेडिया या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा सुरूवातीपासून होत्या. परंतू चित्रपटाला म्हणावी तशी कामगिरी करण्यात यश मिळाले नाहीये. नक्कीच अजय देवगणच्या दृश्यम 2 मुळेही भेडियाला मोठा फटका बसला आहे.
#Drishyam2 continues to set the cash registers ringing… Note the solid hold on weekdays, this movie is simply unstoppable… [Week 2] Fri 7.87 cr, Sat 14.05 cr, Sun 17.32 cr, Mon 5.44 cr, Tue 5.15 cr, Wed 4.68 cr. Total: ₹ 159.17 cr. #India biz. pic.twitter.com/pXe6pUou3T
— taran adarsh (@taran_adarsh) December 1, 2022
दृश्यम 2 या चित्रपटाने आतापर्यंत 159.17 कोटींची कमाई केलीये. अजून पुढचे काही दिवस चित्रपट चांगली कामगिरी करू शकतो, असे सांगितले जात आहे. वीकेंडचा फायदा दृश्यम 2 ला होणार आहे. कारण या आठवड्यामध्ये दुसरा कोणता मोठा चित्रपट अजून रिलीज झाला नाहीये.
25 नोव्हेंबरला वरुण धवनच्या भेडिया हा चित्रपट रिलीज झालाय. आतापर्यंत भेडिया या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर 33.82 कोटींची कमाई केलीये. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.
#Bhediya at *national chains*… WEEK 1: *Day 4* vs *Day 5* vs *Day 6* biz… ⭐️ #PVR: 82 lacs / 75 lacs / 67 lacs ⭐️ #INOX: 54 lacs / 53 lacs / 46 lacs ⭐️ #Cinepolis: 35 lacs / 33 lacs / 29 lacs ⭐️ Total: ₹ 1.71 cr / ₹ 1.61 cr / ₹ 1.42 cr pic.twitter.com/x2chtJD3ze
— taran adarsh (@taran_adarsh) December 1, 2022
कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही धमाका करू शकत नव्हते. 2022 हे वर्ष बाॅलिवूडसाठी खराब गेले आहे. कारण बिग बजेटचे चित्रपटही बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेल्याने चित्रपट निर्मात्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.