अमिताभ बच्चन यांच्या ‘ऊंचाई’ची जबरदस्त ओपनिंग, पाहा बाॅक्स ऑफिस कलेक्शन
या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या आहेत, ज्यांनी आतापर्यंत बाॅलिवूडला अनेक हीट चित्रपट दिले आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स ऑफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच नुकताच बिग बी यांचा ऊंचाई हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या आहेत, ज्यांनी आतापर्यंत बाॅलिवूडला अनेक हीट चित्रपट दिले आहेत. अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. कतरिना कैफचा फोन भूत, जान्हवी कपूरचा मिली आणि सोनाक्षी सिन्हाचा डबल XL हे चित्रपट गेल्याच आठवड्यात रिलीज झाले. मात्र, यापैकी एकाही चित्रपटाला बाॅक्स ऑफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही.
काल शुक्रवारी अमिताभ बच्चन यांच्या ऊंचाई हा चित्रपट रिलीज झाला असून सुरूवातीपासूनच चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. आता या चित्रपटाचे कालचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन पुढे आले असून चित्रपटाने चांगली सुरूवात केलीये. शनिवार आणि रविवार बाॅक्स ऑफिसवर चित्रपट धमाका करेल असेही सांगितले जातंय.
ऊंचाई या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, डॅनी डेन्झोंगप्पा, बोमन इराणी, परिणीती चोप्रा, नीना गुप्ता हे प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटामध्ये मोठी धमाल दाखवण्यात आलीये. विशेष म्हणजे हा चित्रपट आपण आपल्या कुटुंबासोबत पाहू शकतो. बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच आता या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप जास्त अपेक्षा आहेत.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ऊंचाई चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.65 ते 2.05 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. हे कलेक्शन पाहता चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग केली आहे. शनिवार आणि रविवार चित्रपटाचे बाॅक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते. हा चित्रपट देशभरात 500 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.