Hrithik Saba: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादविषयी या 10 गोष्टी माहित आहेत का?

अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या आणखी एका व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतंच या दोघांना विमानतळावर हातात हात घालून चालताना पाहिलं गेलं.

Hrithik Saba: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादविषयी या 10 गोष्टी माहित आहेत का?
Hrithik Roshan and Saba AzadImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 3:18 PM

अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या आणखी एका व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतंच या दोघांना विमानतळावर हातात हात घालून चालताना पाहिलं गेलं. त्यामुळे चर्चा काय, हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी लिहिल्या. हृतिक आणि सबामधील वयाचं अंतर याआधी चर्चेचा विषय होता. या दोघांमध्ये जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे. या दोघांची भेट कशी झाली आणि त्यांच्या प्रेमकहाणीला कशी सुरुवात झाली, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्रीसोबतच सबा उत्तम गायिकासुद्धा आहे. जाणून घेऊयात तिच्याविषयी काही खास गोष्टी..

  1. सबा आझादचं खरं नाव सबा सिंग गरेवाल आहे.
  2. भारतातील प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि कम्युनिस्ट नाटककार सफदर हाश्मी यांची ती भाची आहे.
  3. सबाने तिच्या दिवंगत काकाच्या दिल्लीतील जन नाट्यमंच या थिएटर ग्रुपमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे तिने हबीब तन्वीर आणि एम.के. रैना यांच्यासोबत काम केलं.
  4. दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर सबाने पृथ्वी थिएटरमध्ये मकरंद देशपांडे दिग्दर्शित एका नाटकात काम केलं.
  5. इशान नायर दिग्दर्शित ‘गुरूर’ हा तिचा पहिला चित्रपट होता.
  6. तिने 2008 मध्ये अनिल सिनियरच्या ‘दिल कबड्डी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये इरफान, राहुल बोस आणि सोहा अली खान यांच्यादेखील भूमिका होत्या.
  7. इंडियन इंडी म्युझिक सीनमधील ती लोकप्रिय संगीतकार आणि गायिका आहे. 2012 मध्ये तिने अभिनेता आणि संगीतकार इमाद शाहसोबत मॅडबॉय/मिंक हा इलेक्ट्रॉनिक बँड सुरू केला. हा बँड तरुणाईत प्रचंड लोकप्रिय आहे.
  8. सबा आणि इमान शाह यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केलं. 2010 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतरही सबा आणि इमान हे म्युझिक पार्टनर्स म्हणून एकत्र काम करतात.
  9. सबाने 2010 मध्ये ‘द स्किन्स’ ही तिची स्वतःची थिएटर कंपनी सुरू केली. लव्हप्युक या तिच्या पहिल्या नाटकाचं दिग्दर्शन तिने केलं होतं.
  10. ‘रॉकेट बॉइज’ या वेब सीरिजमध्ये ती नुकतीच झळकली.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नावरील हे भन्नाट मीम्स एकदा पहाच; पोट धरून हसाल!

‘कोणाच्या तरी मागे मागे करा, काम मिळत राहणार’; मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.