Gauri Khan | शाहरुख खानच्या ‘या’ सवयीवर गौरी खानने केले मोठे भाष्य, म्हणाली की….
नव्या प्रोमोनुसार शोमध्ये गौरी खान, संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर आणि अनन्या पांडेची आई भावना पांडे कॉफी विथ करण शोच्या प्रोमोमध्ये दिसत आहेत.
मुंबई : बॉलिवूड किंग अर्थात शाहरुख खानची (Shah Rukh Khan) पत्नी गौरी खान कायम चर्चेत असते. नुकताच गौरी खानने ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये हजेरी लावलीय. यावेळी गौरी खानने (Gauri Khan) अनेक मोठे खुलासे देखील केले. कॉफी विथ करण (Koffee With Karan) शोमुळे अनेकदा मोठे वाद निर्माण होतात. नव्या प्रोमोनुसार शोमध्ये गौरी खान, संजय कपूर यांची पत्नी महीप कपूर आणि अनन्या पांडेची आई भावना पांडे कॉफी विथ करण शोच्या प्रोमोमध्ये दिसत आहेत. यावेळी करण सर्वांवर प्रश्नांचा भडीमार करताना देखील दिसतोय.
शाहरुख खानविषयी गौरी खानने केले मोठे भाष्य
कॉफी विथ करण शोमध्ये सहभागी झालेल्या गौरी खानने शाहरुख खानच्या वाईट काही सवयींबद्दल सांगितले. गौरी खानने सांगितले की, आमच्या घरी जेंव्हा पार्टी असते, त्यावेळी शाहरुख नेहमीच येणाऱ्या गेस्टच्या गाडीची वाट पाहात थांबतो. यामुळे असे वाटते की, पार्टी मन्नतच्या आतमध्ये आहे की बाहेर…इतकेच नाही तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, शाहरुख गेस्टला गाडीमध्ये बसेपर्यंत पाहतो.
मला अनेकदा वाटते की मन्नतच्या बाहेर…
शाहरुखचा जास्त वेळ गेस्टच्या गाड्या पाहण्यात जातो. यामुळे घरात पार्टी असली तरीही तो घराच्या बाहेरच जात असतो. पार्टी दरम्यान बरेच लोक शाहरुखला शोधतात. यामुळे मला नेहमीच आवडते की, आम्ही पार्टी घरात नाही तर बाहेर रस्तावर करत आहोत. त्याची ही सवय अगोदरपासूनच आहे. गौरी खान फक्त शाहरुख खानवरच नाही तर शोमध्ये मुलगी सुहानावरतीही मोठे भाष्य केले आहे.