क्रिती सेनन हिने अखेर प्रभास याच्यासोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर सोडले माैन, म्हणाली मी जास्त…

| Updated on: Feb 18, 2023 | 7:38 PM

क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन हे शहजादा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. विकेंडला शहजादा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

क्रिती सेनन हिने अखेर प्रभास याच्यासोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर सोडले माैन, म्हणाली मी जास्त...
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) ही प्रचंड चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे फक्त प्रोफेशनल लाईफमुळेच नाही तर क्रिती तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. नुकताच क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन यांचा शहजादा हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचा ओपनिंग डे ठिक गेला. कारण 17 फेब्रुवारी रोजी शहजादा रिलीज झाला आणि याच दिवशी शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाच्या तिकिटाचा दर कमी करून 110 रूपये करण्यात आला. अनेकांनी 17 फेब्रुवारीला पठाण चित्रपट (Movie) पाहणे पसंद केले. याचा सरळ फटका क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन यांच्या शहजादा या चित्रपटाला बसला. कार्तिक आर्यन याच्या शहजादा या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे एक खास अंदाज या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याचा बघायला मिळत आहे. क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन हे शहजादा या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. विकेंडला शहजादा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. विशेष म्हणजे क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन यांनी शहजादाचे जबरदस्त असे प्रमोशन देखील केले.

गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा सुरू आहे की, क्रिती सेनन ही साऊथचा स्टार प्रभास याला डेट करत आहे. विशेष म्हणजे आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरच प्रभास आणि क्रिती सेनन यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याची माहिती मिळत होती. मात्र, यावर प्रभास किंवा क्रिती सेनन यांनी काहीच भाष्य केले नाहीये.

काही दिवसांपूर्वी एक चर्चा सुरू होती की, प्रभास आणि क्रिती सेनन हे मालदीवला साखरपुडा करणार असून पुढच्या महिन्यात यांचा साखरपुडा पार पडेल. चाहते देखील प्रभास आणि क्रिती सेनन यांनासोबत पाहण्यास इच्छुक नक्कीच आहेत. चाहत्यांना क्रिती सेनन आणि प्रभासची जोडी प्रचंड आवडते.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये क्रिती सेनन ही उघडपणे आपल्या आणि प्रभासच्या नात्यावर बोलली आहे. यावेळी क्रिती सेनन म्हणाली की, लोकांची स्मरणशक्ती कमी झाली असती, कारण ज्या गोष्टींची जास्त चर्चा होते, त्या एक ना एक दिवस संपतात.

पुढे क्रिती सेनन म्हणाली की, मी अशा अफवांवर प्रतिक्रिया दिल्याने त्याला अधिक हवा मिळेल आणि लोकांचे लक्ष अधिक केंद्रित होईल. यामुळे मी नेहमीच यावर बोलणे टाळते. म्हणजेच थोड्यात काय तर क्रिती सेनन हिने प्रभाससोबतच्या अफेअरच्या चर्चांना अफवा असल्याचे म्हटले आहे.