Kriti Sanon | क्रिती सेनॉन हिने केला तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा, म्हणाली मी प्रेमामध्ये…

क्रिती सेनॉन ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. लव्ह लाईफमुळे यावेळी तिने मोठा खुलासा केला, ज्यामुळे क्रिती सेनॉन ही चर्चेत आलीये.

Kriti Sanon | क्रिती सेनॉन हिने केला तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा, म्हणाली मी प्रेमामध्ये...
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 9:05 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Sanon) ही प्रचंड चर्चेत आहे. सतत क्रिती सेनॉन आणि प्रभास हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर अजूनही खुलासा क्रिती सेनॉन किंवा प्रभास यांनी केला नाहीये. मध्यंतरी प्रभास (Prabhas) आणि क्रिती सेनॉन यांच्या साखरपुड्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या. क्रिती सेनॉन आणि प्रभास एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी क्रिती सेनॉन ही करण जोहर (Karan Johar) याच्या शोमध्ये सहभागी झाली होती, त्यावेळी तिने प्रभास याला फोन केला होता. त्यानंतर यांच्या रिलेशनची चर्चा सुरू झाली.

नुकताच क्रिती सेनॉन हिने तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे. पहिल्यांदाच आपल्या लव्ह लाईफबद्दल उघडपणे बोलताना क्रिती सेनॉन ही दिसली. क्रिती सेनॉन म्हणाली की, मी सध्या खूप जास्त बिझी असल्यामुळे कदाचित माझ्या आयुष्यात कोणी नसावे. मी अजून कोणाला भेटले नाहीये अजून तरी…

पुढे क्रिती सेनॉन म्हणाली, आता जरी माझ्या आयुष्यात कोणी नसले तरीही असे नाही की, अगोदर कोणी नव्हते. कदाचित आता खूप काम करण्याची वेळ आहे आणि माझ्या भोवती मला हवी तशी योग्य व्यक्ती नसावी. क्रिती म्हणाली, मला वाटते की, प्रेमामध्ये मी बऱ्याच वेळा खूप जास्त आंधळी होते.

मी कायमच समोरच्या व्यक्तीवर खूप जास्त विश्वास करते. मात्र, आता मी थोडी सर्तक झालीये. मी अगोदर समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेईल…मग हळूहळू त्याच्यावर विश्वास करेल. मला वाटते की, कोणतेही नाते पूर्णपणे विश्वासावर आधारित आहे आणि त्याशिवाय हे नाते पुढे जाऊ शकत नाही. कोणीतरी असे म्हटले आहे की, प्रेमामध्ये माणूस आंधळा होतो…आता क्रिती सेनॉन ही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. म्हणजे क्रितीने प्रभास याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये नसल्याचे म्हटले आहे.

प्रभाससोबत गेल्या काही दिवसांपासून क्रिती सेनॉन हिचे नाव जोडले जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी क्रिती सेनॉन हिने सांगितले होते की, या फक्त आणि फक्त अफवा आहेत. आदिपुरुष या चित्रपटामध्ये क्रिती सेनॉन आणि प्रभास स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आदिपुरुष चित्रपटाच्या सेटवरच प्रभास आणि क्रिती सेनॉन यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याचे सांगितले जाते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.