Kriti Sanon | चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना क्रिती सेनॉन हिने केला बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा, म्हणाली सीक्रेट

क्रिती सेनॉन हिने आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये क्रिती सेनॉन ही चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसली. यावेळी चाहत्यांनी तिच्या पर्सनल लाईफविषयीही अनेक प्रश्न विचारले.

Kriti Sanon | चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना क्रिती सेनॉन हिने केला बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा, म्हणाली सीक्रेट
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 4:35 PM

मुंबई : क्रिती सेनॉन सध्या तिच्या शहजादा या चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि कार्तिक आर्यन चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही क्रिती सेनॉन आणि कार्तिक आर्यन दिसले होते. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. शहजादा फ्लाॅप गेल्याने कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) याला मोठा झटका बसलायं. कारण गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत होते. विशेष म्हणजे आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्यासारख्या स्टारचे चित्रपट ज्यावेळी फ्लाॅप जात होते, त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट (Movie) हिट झाले. नुकताच क्रिती सेनॉन हिने आपल्या रिलेशनशिपवर मोठे भाष्य केले आहे.

क्रिती सेनॉन ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. नुकताच क्रिती सेनॉन हिने इंस्टाग्रामवर आस्क मी सेशन चाहत्यांसाठी ठेवले होते. यावेळी चाहत्यांनी अनेक प्रश्न क्रिती सेनॉन हिला विचारले. विशेष म्हणजे जवळपास सर्वच प्रश्नांची उत्तरे देताना क्रिती सेनॉन ही दिसली आहे. यावेळी चाहते तिला सतत तिच्या रिलेशनशिपवर प्रश्न विचारताना दिले.

एका चाहत्याने विचारले की, तुमच्या बॉयफ्रेंडचे नाव काय आहे. यावर उत्तर देताना क्रिती सेनॉन म्हणाली की, ते सीक्रेट आहे…विशेष म्हणजे ते माझ्यासाठी देखील सीक्रेट आहे…हे म्हणताना क्रिती सेनॉन हसताना देखील दिसली. गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की, क्रिती सेनॉन ही अभिनेता प्रभास याला डेट करत आहे.

प्रभास याच्यासोबत आदिपुरुष या चित्रपटामध्ये क्रिती सेनॉन दिसणार आहे. असे सांगितले जात आहे की, आदिपुरुषच्या सेटवरच प्रभास आणि क्रिती सेनॉन यांची लव्ह स्टोरी सुरू झाली. मात्र, यावर अजूनही प्रभास किंवा क्रिती सेनॉन यांच्याकडून काही भाष्य करण्यात आले नाहीये. मात्र, सतत यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, क्रिती आणि प्रभास लवकरच साखरपुडा करणार आहेत. क्रिती आणि प्रभासचे चाहते आता यांच्या लग्नाची वाट पाहात आहेत. भेडिया चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी वरुण धवन आणि क्रिती करण जोहरच्या शोमध्ये गेले होते. यावेळी क्रिती सेनॉन हिने सर्वांसमोर प्रभासला काॅल केला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.