KRK : सलमान खाननंतर आता केआरकेचा कंगनासोबत पंगा, म्हणाला ”इमर्जन्सी’ चित्रपट होणार फ्लॉप…’

केआरकेनं आता कंगना रनौत विरूद्ध एक ट्विट केलं आहे. नुकतंच कमाल आर खाननं ट्विट केलं की मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकारप्रमाणे इमर्जन्सी चित्रपटही फ्लॉप होईल. (KRK said Kangana Ranaut's upcoming movie "Emergency" will be a flop ...)

KRK : सलमान खाननंतर आता केआरकेचा कंगनासोबत पंगा, म्हणाला ''इमर्जन्सी' चित्रपट होणार फ्लॉप...'
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 11:47 AM

मुंबई : कमाल आर खान (Kamaal R Khan) गेले अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेले कमाल आर खान  (KRK) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कलाकाराला टार्गेट करत असतात. आता केआरकेनं अभिनेत्री कंगना रनौतसोबत पंगा घेतला आहे. केआरकेनं ट्विट करत कंगनाच्या आगामी चित्रपटावर भाष्य केलं आहे.

नुकतंच अभिनेता सलमान खाननं केआरकेविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. ज्यामध्ये आता कोर्टाच्या आदेशानंतर केआरकेनं सलमान खान विरोधात पोस्ट केलेले सर्व व्हिडीओ डिलीट केले आहेत. सलमानसोबतचा वाद शांत झाला नाही तेच केआरकेनं कंगनाशी पंगा घेतला आहे.

कंगनाच्या चित्रपटाला म्हटलं फ्लॉप

केआरकेनं आता कंगना रनौत विरूद्ध एक ट्विट केलं आहे. नुकतंच कमाल आर खाननं ट्विट केलं की मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकारप्रमाणे इमर्जन्सी चित्रपटही फ्लॉप होईल. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी इंदिरा गांधी आणि आणीबाणीवर इंदू सरकार हा चित्रपट बनवला होता आणि हा चित्रपट पाहण्यासाठीही कोणीही गेलं नव्हतं आता दीदी कंगना रनौत या विषयावर चित्रपट बनवत आहे. म्हणजेच, ती सलग 12 वा फ्लॉप चित्रपट देणार आहे. तिचे शेवटचे 11 चित्रपट सुपर फ्लॉप झाले आहेत.

पाहा ट्विट

या ट्विटवरून हे स्पष्ट झालं आहे की केआरकेनं रिलीज होण्यापूर्वीच कंगनाच्या इमर्जन्सी हा चित्रपट फ्लॉप म्हणून घोषित केला आहे, तर कंगनाच्या शेवटच्या 11 चित्रपटांनाही फ्लॉप म्हटलं आहे. मात्र स्वत: कंगनानं दिग्दर्शित केलेल्या मणिकर्णिकानं 100 कोटींची कमाई केली होती.

कंगनानं क्वीनपासून आतापर्यंत 10 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत ज्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सुमारे 100 कोटींची कमाई केली होती. 2015 मध्ये तिच्या तनु वेड्स मनु रिटर्न्स या चित्रपटाने 243 कोटींची कमाई केली असून हा चित्रपट कंगनाचा आजपर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.

काय असेल कंगनाचे उत्तर?

आता केआरकेनं कंगनाच्या चित्रपटांना फ्लॉप म्हणून संबोधलं आहे, अभिनेत्री यावर कसा प्रतिसाद देते हे पाहण्यासारखं असेल. कारण स्वत: कंगनाही तिच्या वादांसाठी खास ओळखली जाते आणि सोशल मीडियावर प्रत्येकाला उत्तर देतानाही दिसते. अशा परिस्थितीत केआरकेला कंगना कसा प्रतिसाद देईल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. नुकतंच कंगनानं तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Photo : प्रियंका चोप्रानं ‘सोना’ रेस्टॉरंटमध्ये चाखली पाणीपुरी, शेअर केले खास फोटो

Photo : स्टायलिश आणि सुंदर, पाहा प्राजक्ता माळीचे काही खास फोटो

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.