Khiladi Trailer : रवी तेजाच्या ‘खिलाडी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अॅक्शन आणि कॉमेडीचा जोरदार तडका!

बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला रवी तेजाचा बहुचर्चित चित्रपट खिलाडीचे (Khiladi) ट्रेलर (Trailer)  नुकतेच रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये (Movie) भरपूर अॅक्शन आणि कॉमेडीची मेजवानीच मिळणार आहे.

Khiladi Trailer : रवी तेजाच्या 'खिलाडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, अॅक्शन आणि कॉमेडीचा जोरदार तडका!
खिलाडी चित्रपटाचे ट्रेलर रिलीज
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 8:39 AM

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला रवी तेजाचा (Ravi Teja) बहुचर्चित चित्रपट खिलाडीचे (Khiladi) ट्रेलर (Trailer)  नुकतेच रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये भरपूर अॅक्शन आणि कॉमेडीची मेजवानीच मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये कलाकार धमाकेदार अॅक्शन करताना दिसत आहेत. अॅक्शनसोबतच यात कॉमेडी आणि रोमान्सही बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये रवी त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये दिसत आहे.

अॅक्शन, कॉमेडी आणि रोमान्स 

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रवी तेजाचे जबरदस्त कॉमिक टायमिंग पाहायला मिळत आहे. यासोबतच त्याची रोमँटिक स्टाइलही पाहायला मिळाली. यात तो डिंपल हयाती आणि मीनाक्षी चौधरी या दोन अभिनेत्रींवर रोमान्स करताना दिसत आहे. त्याचे अॅक्शन सीन्सही खूप छान दाखवले आहेत. स्टोरी मनी माइंडेड व्यक्तीची आहे. यामध्ये कन्नड चित्रपट अभिनेता अर्जुन सर्जा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसला असून अनसूया भारद्वाज लोकांना हसवताना दिसणार आहे.

इथे पाहा चित्रपटाचा ट्रेलर

रवीने या चित्रपटाद्वारे हिंदीमध्ये एन्ट्री केली आहे. रवीचा ‘खिलाडी’ हा चित्रपटही हिंदीत प्रदर्शित होणार आहे. रवीचा हा चित्रपट हिंदी भाषेबरोबरच तेलुगु भाषेतही एकाच वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता साऊथचे बरेचसे चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होऊ लागले आहेत, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हिंदी प्रेक्षकांचा साउथच्या चित्रपटांकडे वाढलेला रस आहे.

या तारखेला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार

या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश वर्मा यांनी केले असून देवी श्री प्रसाद यांचे संगीत आहे. हा चित्रपट 11 फेब्रुवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रवी तेजाचा मागील चित्रपट ‘क्रॅक’ 9 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तो चित्रपट देखील हिट ठरला. रवीच्या क्रॅक चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती.

संबंधित बातम्या : 

कपिल-अक्षयच्या दोस्तीत कुस्ती; ‘बच्चन पांडे’च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार कपिल शोमध्ये जाणार नाही, दगाबाजी केल्याचा आरोप

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठीतले मोठे तारे-सितारे कुठे गायब होते? दबक्या आवाजात कुजबूज सुरु!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.