Kumar Sanu | कुमार सानू यांच्या निशाण्यावर थेट कलाकार, म्हणाले, यामधून सुटका होणे गरजेचे
कुमार सानू यांनी एक काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. कुमार सानू यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. कुमार सानू हे नेहमीच चर्चेत असतात. कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार जानू याने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे.
मुंबई : कुमार सानू यांनी त्यांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट गाणी गायली आहेत. कुमार सानू (Kumar Sanu) हे कायमच चर्चेत असतात. कुमार सानू आणि त्यांचा मुलगा जान कुमार सानू यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा कुमार सानू यांचा मुलगा जान हा वडिलांसोबत असलेल्या नात्यावर भाष्य करताना दिसतो. कुमार सानू यांनी माझ्या चांगल्या करिअरसाठी (Career) काहीच प्रयत्न नसले केल्याचे त्याने काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. जर त्यांनी थोडे जरी प्रयत्न केले असते तर नक्कीच मी आज वेगळ्या ठिकाणी असतो. त्यानंतर कुमार सानू यांनीही लेकाचा चांगलाच समाचार हा घेतला होता. कुमार सानू आणि जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) यांच्यामध्ये नेहमीच वाद बघायला मिळतो.
नुकताच कुमार सानू यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमुळे आता कुमार सानू हे चर्चेत आहेत. कुमार सानू म्हणाले की, आजच्या काळात चांगली गाणी आणि चांगल्या कलाकारांची कमी आहे. गायक सर्व चांगले आणि सक्षम आहेत, परंतु त्याच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर केला जात नाहीये. मग विचार केला तर आमची जी पिढी होती ती खरोखरच खूप जास्त भाग्यवान होती.
आजच्या संगीत दिग्दर्शकांनी पाश्चात्य संगीतावरील असलेले लक्ष कमी करून जर आपल्या भारतीय संगीत संस्कृतीवर अधिक लक्ष दिले तर नक्कीच ही परिस्थिती सुधारू शकते. सध्या पाश्चात्य संगीताकडे अधिक लक्ष असल्याने या सर्व समस्या निर्माण होतात. सध्या बऱ्याच गोष्टी या कलाकार ठरवत आहेत.
कोणता गायक त्यांच्यासाठी पार्श्वगायन करणार हे देखील कलाकार ठरवताना दिसत आहेत. हे हस्तक्षेप नको व्हायला हवेत. आता कुमार सानू हे त्यांच्या या मुलाखतीमध्ये चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कुमार सानू यांनी म्हटले होते की, मी सध्याचे नवीन गाणे अजिबात ऐकत नाही आणि मला ते ऐकायला देखील आवडत नाहीत.
मी जुन्या काळातील गाणे नेहमीच ऐकतो. कुमार सानू यांची मुलगा जान कुमार सानू याने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला बरीच वर्ष हे देखील माहिती नव्हते की, माझे वडील कोण आहेत. कारण माझ्या जन्मानंतर काही महिन्याच माझे आई-वडील हे विभक्त झाले होते. मी मोठा झाल्यानंतर मला माझ्या वडिलांबद्दल सांगण्यात आले होते. माझ्या वडिलांसोबतच्या काहीच लहानपणीच्या आठवणी नाहीत.