कारचालकाचं सोहा, इनायासमोर अश्लील वर्तन, शिवीगाळ; कुणाल खेमूची मुंबई पोलिसांकडे तक्रार

रविवारी सकाळी कुटुंबीयांसोबत बाहेर फिरायला गेला असताना अभिनेता कुणाल खेमूला (Kunal Kemmu) अत्यंत वाईट घटनेचा सामना करावा लागला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि मुलगी इनाया होती.

कारचालकाचं सोहा, इनायासमोर अश्लील वर्तन, शिवीगाळ; कुणाल खेमूची मुंबई पोलिसांकडे तक्रार
Kunal Kemmu familyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 3:31 PM

रविवारी सकाळी कुटुंबीयांसोबत बाहेर फिरायला गेला असताना अभिनेता कुणाल खेमूला (Kunal Kemmu) अत्यंत वाईट घटनेचा सामना करावा लागला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि मुलगी इनाया होती. याचसोबत कुणालचे शेजारी आणि त्यांची दोन लहान मुलंसुद्धा होती. एका बेपर्वा ड्रायव्हरने कुणाल आणि त्याच्या कारमध्ये असलेल्यांचा जीव कशाप्रकारे धोक्यात टाकला, याविषयी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहिली. संबंधित कारचा फोटो पोस्ट करत कुणालने मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) मदतीची मागणी केली. कुणालने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक पांढऱ्या रंगाची लॅम्बॉर्गिनी दिसत आहे. या पोस्टमध्ये त्याने मुंबई पोलिसांना टॅग केलं आहे.

नेमकं काय घडलं? ‘आज सकाळी 9 वाजता मी, माझी पत्नी, मुलगी आणि माझे शेजारी त्यांच्या दोन मुलांसह बाहेर नाश्ता करण्यासाठी गेलो होतो. जुहूमध्ये वाटेत हा PY नोंदणीकृत कारचालक बेदरकारपणे गाडी चालवत होता. त्याने फक्त हॉर्न वाजवून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला नाही, तर अचानक ब्रेक लावून माझ्या गाडीसमोर आला. त्याने फक्त स्वतःची सुरक्षा धोक्यात आणली नाही, तर माझ्या कारमधील प्रत्येकाचा जीव धोक्यात आणला. कारण त्याच्या कारशी टक्कर टाळण्यासाठी मला खरोखरच जोरदार ब्रेक लावावा लागला. माझ्या कारमधील लहान मुलांसाठी ही अत्यंत धक्कादायक घटना होती. माझ्या गाडीमधील महिला आणि लहान मुलांना पाहूनसुद्धा त्याने शिवीगाळ केली आणि अश्लील वर्तन केलं,’ असं कुणालने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं.

या घटनेविषयी सांगताना त्याने पुढे लिहिलं, ‘त्या कारचालकाचा मूर्खपणा रेकॉर्ड करण्यासाठी मी माझा फोन काढला, पण तोपर्यंत तो पुन्हा त्याच्या कारमध्ये बसला आणि तिथून निघून गेला. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या घृणास्पद वर्तनाकडे लक्ष द्यावं आणि योग्य ती कारवाई करावी.” अभिनेत्री सोहा अली खाननेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर हा पोस्ट शेअर केला आणि मुंबई पोलिसांना टॅग केलं.

सोहा ही अभिनेता सैफ अली खानची बहीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांची मुलगी आहे. सोहा आणि कुणालने जुलै 2014 मध्ये पॅरिसमध्ये साखरपुडा केला आणि 25 जानेवारी 2015 रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली. या दोघांना इनाया नौमी खान ही मुलगी आहे.

हेही वाचा :

‘हा तर महिलांचा अनिरुद्धला सामूहिक शिव्या देण्याचा कार्यक्रम..’; मिलिंद गवळींचा किस्सा वाचाच!

नागराज मंजुळेंचा ‘झुंड’ नेमका कुठे कमी पडतोय? दुसऱ्या दिवशीही कमाई धीम्या गतीनेच

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.