Laal Singh Chaddha: आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ची धिम्या गतीने सुरुवात; पहिल्या दिवसाची कमाई जेमतेमच!

या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ही रणवीर सिंगच्या '83' इतकीच झाली. त्यामुळे आता वीकेंडच्या कमाईचा आकडा किती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Laal Singh Chaddha: आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'ची धिम्या गतीने सुरुवात; पहिल्या दिवसाची कमाई जेमतेमच!
Laal Singh ChaddhaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 10:03 AM

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलंय. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट रक्षाबंधनच्या मुहूर्तावर 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटासोबतच अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ हा चित्रपटसुद्धा रक्षाबंधनच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर या दोन बड्या कलाकारांच्या चित्रपटांमध्ये मोठी टक्कर असून पहिल्या दिवसाची कमाई (Box Office Collection) मात्र जेमतेमच झाल्याचं पहायला मिळालं. अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचं पटकथालेखन मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णीने केली. ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा हा रिमेक आहे. यामध्ये आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई ही रणवीर सिंगच्या ’83’ इतकीच झाली. त्यामुळे आता वीकेंडच्या कमाईचा आकडा किती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुपारनंतर या चित्रपटाची कमाई थोडीफार होऊ लागली. बॉक्स ऑफिस इंडिया डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार ‘लाल सिंग चड्ढा’ने पहिल्या दिवशी जवळपास 10 ते 11 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दुसरीकडे या चित्रपटाला पायरसीचाही फटका बसला आहे. आमिरचा हा चित्रपट तमिळरॉकर्स, फिल्मीझिला, मूव्हीरुल्ज, टेलिग्राम यांसह इतर प्लॅटफॉर्म्सवर एचडी व्हर्जनमध्ये लीक झाला आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीसुद्धा सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ची मागणी झाली होती. याचाही फटका कमाईवर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरून पंजाबमध्ये हिंदू आणि शिख संघटना आमनेसामने आल्या आहेत. हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याच्या कारणावरुन हिंदू संघटनांनी आमिर खान आणि त्याच्या चित्रपटाचा विरोध सुरु केला आहे. तर शिख संघटना आमिर खानच्या बाजूने मैदानात उतरल्याचं दिसत आहे. शिख संघटनांचं म्हणणं आहे की, लाल सिंग चड्ढा हा चित्रपट एका शिख पात्रावर आधारित आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा अधिकार हिंदू संघटनांना नाही. दोन प्रमुख समुदायांचे लोक एकमेकांसमोर आल्याने जालंधरमधील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.