‘लगान’मधील ‘केसरीया’ आर्थिक तंगीने बेजार, 11 वर्षांपासून बेरोजगार, औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत!

‘लगान’ या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटात ‘केसरीया’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री परवीना बानोची (Parveen Bano) अवस्था वाईट झाली आहे. तिच्याकडे औषध विकत घेण्यासाठी देखील पैसे नाहीत. आतापर्यंत कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलेले नाही.

‘लगान'मधील ‘केसरीया’ आर्थिक तंगीने बेजार, 11 वर्षांपासून बेरोजगार, औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत!
Parveena Bano
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 4:46 PM

मुंबई : ‘लगान’ या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटात ‘केसरीया’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री परवीना बानोची (Parveen Bano) अवस्था वाईट झाली आहे. तिच्याकडे औषध विकत घेण्यासाठी देखील पैसे नाहीत. आतापर्यंत कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलेले नाही. 42 वर्षीय परवीना बानो गेल्या 11 वर्षांपासून बेरोजगार आहेत. त्याच्यावर उपचार सुरु असताना आता त्यांची असलेली ठेव देखील संपली आहे. परवीना बानो यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये आपली दुर्दशा आणि या आजाराबद्दल सांगितले आहे.

परवीन म्हणतात की, कुटुंबाकडे कमाईचे कोणतेही साधन नाही. अनेकांकडे मदत मागितली होती, पण कोणीही मदत केली नाही. त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि दर आठवड्याला त्यांना 1800 रुपयांचे औषध घ्यावे लागेल. औषध खरेदी करण्यासाठीही आता त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्या म्हणतात की, अनेक लोकांनी त्यांच्यासाठी रेशन पाठवले आहे.

2011 मध्ये आला ब्रेन स्ट्रोक

‘लगान’ चित्रपटात केसरीयाची भूमिका साकारणाऱ्या परवीना बानो यांना 2011 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. यानंतर इतर अनेक रोगांनी त्यांना घेरले. त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, आता त्या आपली मुलगी आणि लहान बहिणींसमवेत घरी राहतात. त्यांच्या जवळ असलेल्या सगळ्या ठेवी आता संपल्या आहेत आणि त्यांना काम देखील नाहीय.

काळजी घेणाऱ्या भावालाही कर्करोग

परवीना सांगतात की, पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्या घरात एकमेव कमावत्या व्यक्ती होत्या. त्या चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करून पैसे कमवत असत. परंतु, जेव्हापासून ब्रेन स्ट्रोक झाला, तेव्हापासून त्यांची शारीरिक आणि आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. त्यांची काळजी घेणाऱ्या भावालाही कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. त्या सांगतात की, त्यांना 2011 मध्ये संधिवात देखील जडला.

उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि अर्धांगवायूचा झटका आला. गेली अनेक वर्षे त्या या आजारांनी घेरलेल्या आहेत आणि त्यांच्याशी लढत आहेत.

परवीना सांगतात की, आजारपणानंतर त्यांची बहीण हे घर चालवायची. परवीन यांची लहान बहीण सहाय्यक संचालक म्हणून काम करून घरखर्च चालवत होती. यातून त्यांचा उदरनिर्वाह होत होता. पण, लॉकडाऊन असल्याने आता त्यांच्याकडेही काम नाहीय.

जर योग्य उपचार मिळाले, तर मी पुनरागमन करेन!

जर माझ्या उपचार आणि औषधांची व्यवस्थित व्यवस्था केली गेली, तर मी पुन्हा कामावर परतु शकते. परंतु, केवळ उपचार आणि औषधांसाठी पैशाचा विचार करूनच आमची आशा आता मावळत चालली आहे. वास्तविक, मेंदूमध्ये झालेल्या गाठी औषधांच्या मदतीने बऱ्या केल्या जाऊ शकतात, असे देखील परवीन म्हणाल्या.

सोनू सूदने केली मदत

जेव्हा एका प्रसिद्ध माध्यमाने सोनू सूदला परवीनाच्या स्थितीची जाणीव करून दिली, तेव्हा तिच्या टीमने तात्काळ मदत केली आणि त्यांनी एका महिन्याचे रेशन परवीनाला पाठवले आणि एक महिन्याच्या औषधांची व्यवस्था देखील केली.

हेही वाचा :

Sardar Udham : अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओने ‘सरदार उधम’च्या वर्ल्ड वाइड प्रीमियरची केली घोषणा!

Urfi Javed : ‘स्टायलिश क्वीन’ उर्फी जावेदचा बॅकलेस फोटो व्हायरल; चर्चा तर होणारच

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.