Sushmita Lalit Affair: ‘तुम्ही मला फरार म्हणता पण..’, सुष्मितासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदींचं उत्तर

ललित मोदींनी या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहित ललित मोदींनी त्यांच्याबद्दल व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sushmita Lalit Affair: 'तुम्ही मला फरार म्हणता पण..', सुष्मितासोबतच्या नात्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ललित मोदींचं उत्तर
Sushmita Sen: 'गोल्ड डिगर', 'लोभी' म्हणणाऱ्यांना सुष्मिताने सुनावलंImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 12:59 PM

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्या नात्यावरून देशभरात खळबळ उडाली आहे. ललित मोदी आणि सुष्मिता सेन रिलेशनशिपमध्ये (relationship) असल्याच्या बातम्या आल्यापासून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान आता ललित मोदींनी या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहित ललित मोदींनी त्यांच्याबद्दल व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्यांनी या पोस्टद्वारे स्वत:ला ट्रोल केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

‘दोघांमध्ये केमिस्ट्री चांगली असेल तर..’

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये मोदींनी लिहिलं की, ‘मीडियाला मला ट्रोल करण्याचं इतकं वेड का आहे? मला जाहीरपणे चार चुकीच्या पद्धतीने टॅग केलं जात आहे. मला वाटतं की आपण अजूनही मध्ययुगात जगत आहोत. दोन व्यक्ती एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकत नाहीत का? आणि दोघांमुळे केमिस्ट्री चांगली असेल आणि वेळ चांगली असेल तर जादूई पद्धतीने गोष्टी घडू शकतात. माझा सल्ला हाच असेल की जगा आणि इतरांना जगू द्या.’

हे सुद्धा वाचा

‘तुम्ही मला फरारी म्हणता पण..’

त्यांनी पुढे लिहिलं की, ‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्टाइलमध्ये खोट्या बातम्या लिहू नका, योग्य बातम्या लिहा. जर तुम्हाला माहित नसेल तर मी हे स्पष्ट करू इच्छितो की मीनल मोदी विवाहित असताना 12 वर्षे माझी चांगली मैत्रीण होती. ती माझ्या आईची मैत्रिण नव्हती. या अफवा निहित स्वार्थाने पसरवल्या जात होत्या. या छोट्याशा विचारांतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आशा आहे की तुम्हाला याचा अर्थ काय ते माहित असेल. एखादा व्यक्ती आनंदी होत असेल तर त्याचा तुम्हीसुद्धा आनंद घ्या.’

‘मी तुम्हा सर्वांपेक्षा ताठ मानेने जगतो. तुम्ही मला ‘फरारी’ म्हणता, पण तुम्हीच मला सांगा की कोणत्या न्यायालयाने मला ‘कधी दोषी’ ठरवलं आहे. मी तुम्हाला सांगतो, कोणीच मला कधी दोषी ठरवलं नाही. भारतातील 12-15 शहरांमध्ये व्यवसाय करणं किती कठीण आहे हे सर्वांना माहीत आहे. मी 2008 IPL मध्ये म्हटल्याप्रमाणे मंदी याचा पुरावा आहे, त्यावेळी सगळे हसले. आता कोण हसत आहे? कारण सर्वांना माहित आहे की मी हे सर्व एकट्याने केलं आहे,’ अशा शब्दांत त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.

ललित मोदी यांची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

‘तुम्ही मला फरार म्हणता तेव्हा मला त्याची चिंता वाटते असं वाटतं का? तर नाही. मी तोंडात हिऱ्याचा चमचा घेऊन जन्माला आलो. मी कधीही लाच घेतली नाही किंवा तशी मला कधी गरजच पडली नाही. कधीच सरकारची मदत घेतली नाही. तुम्ही तुमचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. जेव्हा मी BCCI जॉईन केलं होतं, तेव्हा बँकेत 40 कोटी रुपये होते. मी 29 नोव्हेंबर 2005 रोजी माझ्या वाढदिवशी सहभागी झालो होतो. माझ्यावर बंदी असताना बँकेत किती रुपये होते? तर 47,680 कोटी रुपये. एकाही व्यक्तीने मदत केली नाही. कुठून सुरुवात करावी हे त्यांना सुचत नव्हतं. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आता ते हिरोसारखे वागतात,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

गुरुवारी ललित मोदी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचं नातं जाहीर केलं. ट्विट करताना त्यांनी सुष्मिताला बेटर हाफ म्हटलं. त्यानंतर दोघांचं लग्न झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र ट्विटनंतर काही मिनिटांतच ललित मोदींनी लग्न झालं नसल्याचं स्पष्ट केलं. सध्या दोघंही एकमेकांना डेट करत आहेत.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.