Lata Mangeshkar health update : लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास, व्हेंटिलेटरवर ठेवले

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर आसल्याची माहिती आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्या व्हेंटिलेटरवर आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास, व्हेंटिलेटरवर ठेवले
लता मंगेशकर
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 2:18 PM

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar health update) यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy hospital) उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लता मंगेशकर यांना काही दिवसांआधी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झालाय. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. लता मंगेशकर यांचं सध्या वय 92 वर्ष आहे. त्यांचं वय पाहता त्यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सगळीकडे प्रार्थना केल्या जात आहेत.

डॉक्टर काय म्हणाले? 

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा ढासळली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या व्हेंटिलेटरवर आहे. तसंच अजूनही आयसीयूमध्ये असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतित समदानी यांनी दिली आहे.

काही दिवसांआधी डॉक्टरांनी लतादिदींच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा असं सांगितलं होतं. डॉक्टरांचं विशेष पथक लता दिदींवर उपचार करत आहे. डॉ. प्रतित समदानी यांनी काही दिवसांपूर्वी लतादिदींच्या हितचिंतकांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतं.

संबंधित बातम्या

गंगुबाईचा ट्रेलर कसा वाटला?, रणबीरकडून आलियाची स्टाईल कॉपी, म्हणतो, ‘बोले तो झक्कास!’

Rocket Boys Review : होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांचा संघर्ष पाहायचा असेल तर अजिबात चुकवू नका ही वेबसिरिज

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनकडे करोडोची संपत्ती, अलिशान गाड्या आणि बरंच काही…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.