Liger Box Office: 17 शहरांमध्ये जोरदार प्रमोशन करूनही विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ची कमाई जेमतेमच!

लायगरचा हिंदी व्हर्जन गुरुवारी रात्री 9 नंतर प्रदर्शित झाला. त्यामुळे हिंदीच्या कमाईचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. अनेकांनी चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. काहींनी कथा कमकुवत असल्याचं मत मांडलं.

Liger Box Office: 17 शहरांमध्ये जोरदार प्रमोशन करूनही विजय देवरकोंडाच्या 'लायगर'ची कमाई जेमतेमच!
या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये तर अनन्याने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 8:20 AM

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लायगर’ (Liger) हा गुरुवारी रात्री 9 नंतर प्रदर्शित झाला. या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये तर अनन्याने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लायगरच्या तमिळ आणि तेलुगू व्हर्जनने जगभरात फक्त 25 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते ही कमाई (Box Office Collection) अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित ‘लायगर’मध्ये प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन, रम्या कृष्णन आणि रोनीत रॉय यांच्याही भूमिका आहेत.

आंध्र बॉक्स ऑफिस डॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, लायगरच्या तेलुगू आणि तमिळ व्हर्जनने पहिल्या दिवशी 24.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि अमेरिकेतील कमाईचा हा आकडा आहे. लायगरचा हिंदी व्हर्जन गुरुवारी रात्री 9 नंतर प्रदर्शित झाला. त्यामुळे हिंदीच्या कमाईचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. अनेकांनी चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. काहींनी कथा कमकुवत असल्याचं मत मांडलं. तर काहींनी विजय आणि रम्या कृष्णन यांचं दमदार अभिनय असूनही चित्रपटात फारसा दम नसल्याचं म्हटलं.

हे सुद्धा वाचा

ज्या पद्धतीने संपूर्ण देशभरात या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं, त्यानुसार चित्रपटाची कमाई दणक्यात होणं अपेक्षित होतं. विजयने 17 शहरांमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. या प्रत्येक शहरातील प्रमोशनच्या कार्यक्रमात विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लायगर प्रदर्शित होण्यापूर्वी सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लायगर’चा ट्रेंड सुरू झाला होता. त्यामुळे त्याचाही फटका चित्रपटाच्या कमाईवर झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

या चित्रपटाचं बजेट जवळपास 90 कोटींच्या घरात असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिली. हा तेलुगू आणि हिंदी अशा दोन भाषेतील चित्रपट असल्याने विजयने जवळपास 20 ते 25 कोटी रुपये मानधन घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.