Liger: ‘लायगर’च्या नवीन गाण्यात विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा रोमँटिक अंदाज; प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेची (Ananya Panday) ही जोडी या गाण्यात रोमँटिक मूडमध्ये दिसणार आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये अनन्या आणि विजय वेगळ्या अंदाजात पहायला मिळत आहेत.

Liger: 'लायगर'च्या नवीन गाण्यात विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा रोमँटिक अंदाज; प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता
Liger: 'लायगर'च्या नवीन गाण्यात विजय देवरकोंडा-अनन्या पांडेचा रोमँटिक अंदाजImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 2:50 PM

अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांचा बहुप्रतिक्षित ‘लायगर’ (Liger) हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी हा चित्रपट चर्चेत आला आहे तो त्याच्या एका नवीन गाण्याच्या टीझरमुळे. विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेची (Ananya Panday) ही जोडी या गाण्यात रोमँटिक मूडमध्ये दिसणार आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये अनन्या आणि विजय वेगळ्या अंदाजात पहायला मिळत आहेत. लवकरच या चित्रपटाचं गाणं प्रदर्शित होणार आहे. विजयने या गाण्याचा टीझर व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळसुद्धा सांगितली आहे. ‘एक सुंदर ड्रामा क्वीन नेहमीच असते, जी आई आणि मुलामध्ये येते,’ असं कॅप्शन देत विजयने आफत या गाण्याचा टीझर पोस्ट केला आहे. हे गाणं उद्या (6 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लायगरच्या प्रदर्शनाची उत्सुकता

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलीच पसंती मिळाली होती. नुकतंच या चित्रपटातील ‘वाट लगा देंगे’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यालाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. आता प्रेक्षकांमध्ये ‘आफत’ या गाण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

पहा टीझर

लायगर हा स्पोर्ट्स ड्रामा

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लायगर’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा फिल्म आहे. ज्यामध्ये नायकाला त्याच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. मात्र असं असतानाही तो बॉक्सिंगच्या खेळात स्वत:ला सिद्ध करतो. या चित्रपटात अनन्या पांडे विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून ती टॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. या दोन कलाकारांशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जगातील प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसनदेखील या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. येत्या 25 ऑगस्टला लायगर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...