बाॅलिवूडसोबतच या व्यवसायामध्येही शाहरुख खान याचा लेक आर्यन खान नशीब आजमावणार
सोशल मीडियावर याची एक पोस्ट आर्यन याने शेअर केलीये.
मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा लेक आर्यन खान हा बाॅलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करणार आहे. मात्र, त्यापूर्वी मोठ्या एका बिझनेसमध्ये आर्यन पदार्पण करणार आहे. याची माहिती आता स्वत: आर्यन खान याने दिलीये. सोशल मीडियावर याची एक पोस्ट आर्यन याने शेअर केलीये. कार्तिक बाॅलिवूडसोबतच आता दारूच्या व्यवसायामध्ये पाऊल ठेवतो आहे. त्याने एका मोठ्या कंपनीसोबत डिल देखील केलीये. AB InBev सोबत आर्यन याने भागीदारी केली आहे.
आर्यन खान बंटी सिंह आणि लेटी ब्लागोएवा या भागीदारांसोबत आपला व्यवसाय सुरू करत आहे. तिघे मिळून अल्ट्रा-प्रीमियम वोडका ब्रँड डीयावोल (D’Yavol) लॉन्च करत आहेत. विशेष म्हणजे आर्यनच्या या व्यवसायाबद्दल शाहरुख खान आणि गाैरी खान देखील उत्सुक आहेत.
AB InBev च्या नावाने भारतामध्ये विकले आणि वितरित केले जाणार आहे. आर्यन खान म्हणाला की, मी युवकांच्या मानसिकेला ओळखतो. मुळात भारतामध्ये अशा ब्रँडची खूप जास्त कमी आहे. यामुळे इथे बिझनेस करण्यासाठी चांगली संधी नक्कीच आहे.
पुढच्या वर्षांच्या सुरूवातीच्या काळात बेवरेज कंपनीच्या माध्यमातून विस्की आणि रमसारखी ब्राउन स्पिरिट लॉन्च केली जाणार आहे. आता सुरूवातीला प्रीमियम वोडका ब्रँड लॉन्च केला जाईल.
आर्यन खान याने त्याच्या इंस्टाग्रामवर डी’यावॉल ब्रँडचा लोगोही शेअर केला आहे. म्हणजेच काय तर आता आर्यन खान याने दारूच्या व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे. बाॅलिवूडमध्येही आर्यन खान लवकरच दिसणार आहे.
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही देखील बाॅलिवूडमध्ये 2023 ला पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे सुहाना खान, खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे बाॅलिवूडमध्ये सोबतच पदार्पण करणार आहेत.