Masoom Sawaal: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो दाखवल्याने दिग्दर्शकांविरुद्ध FIR; ‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर अनेक अभिनेत्यांसह भगवान कृष्णाचा फोटो दिसत आहे. यामुळेच दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे.

Masoom Sawaal: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो दाखवल्याने दिग्दर्शकांविरुद्ध FIR; 'मासूम सवाल' चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद
Masoom Sawaal: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो दाखवल्याने दिग्दर्शकांविरुद्ध FIRImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 11:27 AM

Masoom Sawaal Controversy: महिलांच्या मासिक पाळीवर आधारित ‘मासूम सवाल’ (Masoom Sawaal) या चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे. हिंदु राष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अमित राठोड यांनी पोस्टरवरील भगवान कृष्णाच्या (Lord Krishna) चित्रावर आक्षेप नोंदवला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय आणि नक्षत्र 27 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी साहिबाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित राठोड म्हणाले, “मासूम सवाल या चित्रपटात लोकांच्या भावना दुखावण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने एक वादग्रस्त पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे, ज्यामध्ये मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडवर (Sanitary Pad) भगवान कृष्णाचं चित्र लावण्यात आलं आहे. 5 ऑगस्ट रोजी हा चित्रपट एका नामांकित शाळेत विद्यार्थिनींनाही दाखवण्यात आला.”

त्यांच्या मते उदयपूरच्या घटनेनंतर देशातील वातावरण आधीच चांगले नाही. बॉलिवूड कलाकारांच्या वादग्रस्त विधानांचाही त्यांनी संदर्भ दिला, ज्यामुळे प्रेक्षक अस्वस्थ झाले आहेत. राठोड यांनी साहिबााबाद पोलिसांना लेखी तक्रार देऊन चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी दिग्दर्शक संतोष उपाध्याय, नक्षत्र 27 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याचं पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रदीप त्रिपाठी यांनी सांगितलं. याप्रकरणी लवकरच चित्रपट दिग्दर्शकांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

5 ऑगस्ट रोजी ‘मासूम सवाल’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अजूनही सुरूच असून काही संघटनांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांना धमकीही दिली आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर अनेक अभिनेत्यांसह भगवान कृष्णाचा फोटो दिसत आहे. यामुळेच दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे.

चित्रपटाचा पोस्टर-

दिग्दर्शक संतोष उपाध्याय काय म्हणतात?

या वादावर संतोष उपाध्याय म्हणाले, “मासूम सवालच्या पोस्टरवरून एवढा गोंधळ होईल याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. कारण ते आमचं ध्येय नव्हतं. आमचा चित्रपट व्यावसायिक चित्रपट नाही. या चित्रपटातून आम्हाला एक संदेश द्यायचा आहे. आमच्या चित्रपटाची थीम आणि कथा मासिक पाळी आहे. या विषयावर चित्रपट बनवताना आम्ही रिलीज केलेलं पोस्टर अजिबात नियोजित नव्हतं. जेव्हा हा पोस्टर बनवण्यात आला तेव्हा तेव्हा आम्हाला वाटलं होतं की त्यावरून लोकांना चित्रपटाची संकल्पना कळेल. पण अशा प्रकारचा वाद होईल, याची आम्हाला अपेक्षा नव्हती.”

चित्रपटाचा ट्रेलर-

“माफी मागणार नाही”

संतोष उपाध्याय यांनी चित्रपटाच्या पोस्टरमुळे सुरू असलेल्या वादाबद्दल माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संतोष उपाध्याय म्हणतात की, “मला फाशी झाली तरी मी आयुष्यात कधीही माफी मागणार नाही. सध्या सॅनिटरी पॅडवर कृष्णाचा फोटो दिसत आहे, परंतु चित्रपटात आम्ही मासिक पाळीच्या वेळी मुलींना मूर्तीला स्पर्श करण्यास परवानगी दिली आहे. मासिक पाळीला अशुभ मानलं जाणं हाच आमच्या चित्रपटाचा विषय आहे. संपूर्ण चित्रपट हा 2 तास 25 मिनिटांचा चित्रपट आहे, ज्याला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केलं आहे. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा चित्रपट पाहू शकतो.”

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.