Love Story | विक्रांत मेस्सी इतकीच साधी आणि शांत आहे त्याची होणारी पत्नी, वेब सीरीजमध्ये झळलीय ही जोडी!

विक्रांत आणि शीतल दोघांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही. परंतु, चाहत्यांना दोघांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच असते.

Love Story | विक्रांत मेस्सी इतकीच साधी आणि शांत आहे त्याची होणारी पत्नी, वेब सीरीजमध्ये झळलीय ही जोडी!
विक्रांत आणि शीतल
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 9:21 AM

मुंबई : आपल्या अभिनयातून टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचे मन जिंकणाऱ्या विक्रांत मेस्सीच्या (vikrant massey) हृदयात एकच व्यक्ती आहे, जिच्यावर तो खूप मनापासून प्रेम करतो. विक्रांतने ज्या व्यक्तीला आपले हृदय दिले आहे ती अभिनेत्री शीतल ठाकूर (Sheetal Thakur) आहे. दोघेही एकमेकांवर जितकं प्रेम करतात तितकेच ते एकमेकांचा आदरही करतात.

तसे, विक्रांत आणि शीतल दोघांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही. परंतु, चाहत्यांना दोघांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता नेहमीच असते. चला तर, आज आपण त्यांची क्युट आणि स्वीट लव्हस्टोरी जाणून घेऊया..

2015ला सुरु झाली लव्हस्टोरी!

विक्रांत आणि शीतलची प्रेमकथा वर्ष 2015 मध्ये सुरू झाली. दोघेही आपले वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावरील प्रसिद्धीपासून दूर ठेवत असत. दोघेही अल्ट बालाजीचा शो ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’मध्ये एकत्र दिसले आहेत. या शोमध्ये ती विक्रांतच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. शोमध्ये काम करत असताना, रिअल लाईफमध्येही दोघे एकमेकांच्या जवळ आले.

सोशल मीडियावर प्रेमाचा बहर

यापूर्वी विक्रम आणि शीतल, ज्यांनी यापूर्वी आपले नातं प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवलं होतं. मात्र, आता ते सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे बरेचसे फोटो शेअर करतात. वाढदिवस असो किंवा कोणताही सण, दोघेही एकत्र खास दिवस साजरे करतात.

बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर विक्रांत आणि शीतल यांनी 2019 मध्ये साखरपुडा केला. दोघांनीही आपल्या साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

सुख आणि दु:खामध्ये विक्रांतबरोबर

विक्रांतने काही काळापूर्वी नवे घर खरेदी केले आहे आणि त्याच दरम्यान त्याने शीतल आणि कुटुंबीयांसह गृह प्रवेश आणि पूजा केली. या व्यतिरिक्त विक्रांतला त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात शीतलचे पूर्ण सहकार्य आहे. दोघेही अगदी साधे आहेत आणि आपले नाते देखील ते प्रेमाने जपतात.

लॉकडाऊन नसता तर आम्ही लग्न केले असते!

काही दिवसांपूर्वी विक्रांतने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर लॉकडाऊन नसता तर आतापर्यंत दोघांचे लग्न झाले असते. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विक्रांतने म्हटले होते की, लॉकडाऊन नसते तर माझे लग्न इतक्यात झालेही असते. लॉकडाऊनमुळे आता आम्ही आणखी काही महिने थांबलो आहोत. आम्ही येत्या काही महिन्यांत लग्नाचे नियोजन करू. चाहते या लग्नाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

(Love Story Of Haseen Dilruba fame actor vikrant massey And Actress Sheetal Thakur)

हेही वाचा :

कंटेंट अश्लील होता, परंतु तो ‘प्रौढ’ प्रकारात येऊ शकत नाही! राज कुंद्राच्या वकिलाचा दावा

Mukesh Birth Anniversary : ‘क्या खूब लगती हो’पासून ते ‘मैं पल दो पल का शायर हूं’पर्यंत, ऐका मुकेश यांची सदाबहार गाणी!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.