Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्या मुलीने दोन वर्षात खूप काही कमावलं…’, आलिया भट्टच्या यशाने आनंदी झालेयत महेश भट्ट!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या फिल्मी करिअरच्या शिखरावर आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीची चांगली फॅन फॉलोइंग आहे. नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आलियाने तिच्या मेहनती आणि प्रतिभेने खूप मोठा पल्ला गाठला आहे. अभिनेत्रीने अलीकडेच इटरनल सनशाईन प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली.

‘माझ्या मुलीने दोन वर्षात खूप काही कमावलं...’, आलिया भट्टच्या यशाने आनंदी झालेयत महेश भट्ट!
Alia Bhatt-Mahesh Bhatt
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 11:33 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या फिल्मी करिअरच्या शिखरावर आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीची चांगली फॅन फॉलोइंग आहे. नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आलियाने तिच्या मेहनती आणि प्रतिभेने खूप मोठा पल्ला गाठला आहे. अभिनेत्रीने अलीकडेच इटरनल सनशाईन प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली.

अभिनेत्रीचे पालक महेश भट्ट आणि सोनी राजदान यांना त्यांच्या मुलीचा अभिमान वाटतो आहे. एले मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत, निर्माता आणि आलियाच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या कामगिरीचे कौतुक केले.

महेश भट्ट म्हणाले, ‘मी घर चालवण्यासाठी चित्रपट केले’

महेश भट्ट म्हणाले की, आलियाला आपली गरज नाही, ‘तिच्यात स्वत:चा पाठपुरावा करण्याची क्षमता आहे. जरी मी चित्रपट निर्माता होतो. पण नेहमीच चित्रपटसृष्टीच्या काठावर राहिलो. आमचे घर फिल्मी पार्ट्यांचे आश्रयस्थान नव्हते. घर चालवण्यासाठी मी नेहमीच चित्रपट केले आहेत आणि आलियाला हे नेहमीच माहीत आहे. ती कठोर परिश्रम आणि समर्पणाने काम करते आणि ती खूप हुशार देखील आहे.’

मी 50 वर्षात जितके पैसे कमावले आहेत तितके पैसे तिने 2 वर्षात कमावले!

चित्रपट निर्माते पुढे म्हणाले की, जग प्रेक्षकांनी भरलेले आहे आणि म्हणूनच कलाकार होण्यासाठी खूप धैर्य लागते. जे लोक मेहनत करून चित्रपट बनवतात, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांच्या वाटेला काहीही आले तरी ते भांडतात आणि पुन्हा नव्याने सुरुवात करतात. हे विशेषतः अशा लोकांसाठी आहे, जे अगदी लहान वयात यशाच्या शिखरांना स्पर्श करतात.

ते पुढे म्हणाले की, ‘आलिया लहान असताना ती 500 रुपये घेऊन वडिलांच्या पायाला क्रीम लावायची. एक निर्माता म्हणून, मी 50 वर्षात जेवढे पैसे कमावले तेवढे, पैसे मी गेल्या दोन वर्षात कमावले आहेत.’

आलियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर’पासून केली सुरुवात

आलिया भट्टने 2012 साली करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या अभिनेत्रीने 1999 च्या ‘संघर्ष’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. प्रत्येकजण तिच्या अभिनयाचे कौतुक करतो. खासकरून ‘हायवे’, ‘2 स्टेट्स’, ‘राझी’, ‘डियर जिंदगी’, ‘उडता पंजाब’ आणि ‘कलंक’ या चित्रपटांनी त्याच्या करिअरला एक नवीन स्थान दिले आहे.

‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार जोडी

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. रणबीर-आलियाबरोबर अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट बर्‍याच वेळा पुढे ढकलला गेला आहे. चित्रपटाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडीओ अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.

हेही वाचा :

Hum Do Hamare Do Review : परेश रावल-रत्ना पाठक जोडीशी राजकुमार-क्रितीची तगडी टक्कर, प्रेक्षकांना मिळणार विनोदाची मेजवानी!

Binge Watch | ‘हम दो हमारे दो’पासून ते ‘डिबुक’ पर्यंत, ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार मनोरंजनाची मेजवानी!

काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.