Birth Anniversary | मोलकरीण अभिनेत्री बनली, 450 चित्रपटांमध्ये कामही केलं अन् गळफास घेऊन आयुष्य संपवलं! वाचा सिल्क स्मिताबद्दल…
आज (2 डिसेंबर) प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिताची (Silk Smitha) जयंती आहे. 2 डिसेंबर 1960 रोजी जन्मलेल्या सिल्क स्मिताने अवघ्या 17 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत साडेचारशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
मुंबई : आज (2 डिसेंबर) प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिताची (Silk Smitha) जयंती आहे. 2 डिसेंबर 1960 रोजी जन्मलेल्या सिल्क स्मिताने अवघ्या 17 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत साडेचारशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 17 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये तिला असं स्थान मिळालं जे आजपर्यंत कोणालाही मिळू शकलं नाही. सिल्क आणि सिल्क स्मिता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव विजयालक्ष्मी वडलापती होते.
सिल्कचा प्रवास एका छोट्या अभिनेत्रीच्या घरी मोलकरीण म्हणून काम करण्यापासून सुरु झाला आणि नंतर ती मेकअप असिस्टंट बनली. अशीच एका दिवसाची गोष्ट आहे, जेव्हा एक निर्माता त्याच्या चकचकीत कारमधून त्या अभिनेत्रीच्या घरी आला, तेव्हा सिल्क त्याला पाहू लागल्या. हे पाहून ती अभिनेत्री म्हणाली की, ती या कारमध्ये प्रवास करण्याचे स्वप्न पाहत आहे. सिल्कने त्याच क्षणी उत्तर दिले की, एके दिवशी ती नक्कीच अशाच गाडीतून तिच्या घरी येतील.
प्रेक्षकांवर ‘सिल्की’ जादू…
1970 च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते 1990च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, सिल्क स्मिताची जादू चित्रपटाला एका गाण्याने हिट बनवायची. अनेक चित्रपट जे प्रसिद्ध हिरो असूनही चालले नाहीत, ते फक्त सिल्कचे गाणे असल्यामुळे बरेच पाहिले गेले. बॉक्स ऑफिसवर प्रचंड गर्दी आकर्षित करण्यासाठी ती एक उत्तम साधन बनली. सिल्कने अशी जादू चालवली होती की, तिचे निरागस शरीर, गोलमटोल चेहरा आणि तिच्या किलर लूकने कोणालाही आकर्षित करून घेता येईल.
तिला नेहमीच ग्लॅमरस भूमिका मिळाल्या, तिला नेहमीच ग्लॅमरस भूमिका दिल्या गेल्या. त्यामुळे तिची इमेज हॉट अभिनेत्री अशी बनली. तिला या प्रतिमेतून बाहेर पडायचे होते, पण त्यातूनही ती बाहेर पडू शकली नाही. अनेकांनी त्याच्या चित्रपटांना ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हटले पण त्याचा काही फरक पडला नाही.
विद्या बालनने मोठ्या पडद्यावर साकारली भूमिका
विद्या बालनचा ‘डर्टी पिक्चर’ चित्रपट 2011मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट फक्त 25 कोटी होते. पण, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 83 कोटींची कमाई केली. त्याचवेळी जगभरात 117 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट सिल्क स्मिताचा बायोपिक होता, ज्यामध्ये विद्या बालनने तिची भूमिका केली होती. या चित्रपटातील ‘उलाला उलाला’ हे गाणे प्रचंड गाजले.
वयाच्या 36व्या वर्षी मृत्यूला कवटाळले!
23 सप्टेंबर 1996 रोजी विजयालक्ष्मी उर्फ सिल्क स्मिता तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. तिच्या निधनाने दक्षिणेपासून उत्तर भारतापर्यंत लोकांना धक्का बसला. तिचा खून झाला की आत्महत्या, हे अद्याप पोलिसांना सांगता आले नाही. फॉरेन्सिक तपासणीत विषाचे काहीही निष्पन्न झाले नाही आणि तिचा मृत्यू नेहमी गूढच राहिला.