‘राधे श्याम’च्या सेटवर कलहाचा माहोल? प्रभास-पूजा हेगडेच्या चर्चित वादावर निर्माते म्हणतात…

अभिनेता प्रभास दक्षिणात्य मनोरंजन विश्वापासून बॉलिवूडपर्यंतच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. चाहते प्रभासच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रभास (Prabhas) लवकरच अभिनेत्री पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) 'राधे श्याम' (Radhe Shyam) या रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे.

‘राधे श्याम’च्या सेटवर कलहाचा माहोल? प्रभास-पूजा हेगडेच्या चर्चित वादावर निर्माते म्हणतात...
Radhe Shyam
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 11:05 AM

मुंबई : अभिनेता प्रभास दक्षिणात्य मनोरंजन विश्वापासून बॉलिवूडपर्यंतच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. चाहते प्रभासच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रभास (Prabhas) लवकरच अभिनेत्री पूजा हेगडेसोबत (Pooja Hegde) ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. पण अलीकडेच असे वृत्त आले होते की, या दोन स्टार्समध्ये सर्व काही ठीक सुरु नाहीय.

दोन स्टार्समध्ये काही भांडणे झाल्याचे अनेक मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले गेले होते. तथापि, दोघांमध्ये काय घडले हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झाले नाही. आता निर्मात्यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘राधे श्याम’च्या निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण

बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती की ‘बाहुबली’ स्टार प्रभास चित्रपटाची मुख्य अभिनेत्री पूजा हेगडे हिच्या अव्यवसायिक वर्तनामुळे नाखूश होता. पूजाची काम करण्याची पद्धत अभिनेत्याला आवडली नव्हती. आता अखेर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या संपूर्ण प्रकरणावर एक निवेदन जारी केले आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या या बातमीनुसार प्रभासच्या पुढच्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व अहवाल पूर्णपणे निराधार आहेत. प्रभास आणि पूजा यांना एकमेकांबद्दल खूप आदर आहे. एवढेच नाही तर त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री देखील उत्कृष्ट आहे आणि त्यांची ऑनस्क्रीन जोडी देखील जादुई असणार आहे.

म्हणजेच, निर्मात्यांनी हे स्पष्ट केले आहे की, दोन कलाकारांदरम्यान सर्व काही ठीक सुरु आहे. यूव्ही क्रिएशन्सने पूजाच्या सेटवर उशिरा येण्याच्या सवयीसारख्या बातम्यांचे खंडन केले आहे. निर्मात्यांनी म्हटले आहे की, अभिनेता आणि अभिनेत्री नेहमीच चित्रपटाच्या शूटिंगसाठी वक्तशीर असतात. एवढेच नाही तर, चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रीच्या वाईट वागणुकीच्या वृत्तांवर निर्मात्यांनी म्हटले आहे की, अभिनेत्रीसोबत काम करणे अतिशय सोपे आहे.

निर्माते म्हणाले की, या सर्व बातम्या निराधार आहेत, त्यामध्ये कोणतेही सत्य नाही. चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये सर्व काही ठीक सुरु आहे आणि संपूर्ण टीम प्रेक्षकांसाठी असा अनुभव घेऊन येत आहे, जे ते विसरू शकणार नाहीत. या चित्रपटसोबत जवळपास दशकभराने प्रभास रोमांटिक शैलीत परतत असून, या चित्रपटामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांची नवी जोड़ी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. त्यामधून  प्रभास लवरबॉय इमेजमध्ये दिसत आहे.

प्रभासचा हा चित्रपट 14 जानेवारी 2022 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘राधे श्याम’ हा एक बहुभाषी चित्रपट असून, गुलशन कुमार व टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही यूवी क्रिएशन्सची निर्मिती असून याचे निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.

कॉस्ट्यूमवर कोट्यवधी रुपये खर्च

‘राधे-श्याम’ हा प्रभासच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी एक मोठा चित्रपट आहे. या चित्रपटात निर्माते प्रभासच्या वेशभूषावर जवळपास 6 कोटी खर्च करत आहेत. ज्यामुळे चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत.

आदिपुरुषमध्ये झळकणार प्रभास!

‘राधे श्याम’नंतर प्रभास ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत कृती सेनॉन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात प्रभास ‘राम’, सैफ अली खान ‘रावण’ आणि कृती सेनन ‘सीता’ची भूमिका साकारताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या सेटवर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि संपूर्ण क्रोमा सेट जळून खाक झाला होता. निर्मात्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला होता.

हेही वाचा :

Miss Diva 2021 : मानसा वाराणसीपासून ते रुहीपर्यंत ‘या’ मॉडेल्सने रेड कार्पेटवर दाखलवला ग्लॅमरस अवतार

Nia Sharma : निया शर्माने पुन्हा एकदा बोल्ड लूकने वाढवला इंटरनेटचा पारा, फोटो पाहून चाहत्यांना लागलं वेड

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.