Divorce | याच कारणामुळे मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा घटस्फोट?
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट २०१७ मध्ये झाला. अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या जोडीला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करत होते.
मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मलायका अरोरा कायमच जिमबाहेर स्पाॅट होते. मलायका सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो कायमच शेअर करते. विशेष म्हणजे आज मलायकाचा चाहता वर्गही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या मूव्हिंग इन विथ मलायका या शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोमध्ये अनेकदा मलायका तिच्या पर्सनल लाईफबद्दल (Personal life) देखील सांगते. करण जोहर, भारती सिंह, नोरा फतेही अशा अनेकांनी मलायकाच्या या शोमध्ये हजेरी देखील लावलीये. अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट २०१७ मध्ये झाला. अरबाज आणि मलायकाच्या घटस्फोटानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांच्या जोडीला चाहते मोठ्या प्रमाणात लाईक करत होते. मात्र, मलायका आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेत असल्याचे सांगत मोठी खळबळ निर्माण केली.
मलायका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यास सुरूवात केली. मलायका आणि अरबाज खान यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण काय होते हे अजूनही कळू शकले नाहीये.
View this post on Instagram
एका मुलाखतीमध्ये अरबाज खान याला विचारण्यात आले होते की, तुम्ही कधी मलायकाला तिच्या कपड्यांवरून काही बोलले नाही का? यावर अरबाज खान म्हणाला होता, मी कधीच मलायकाला तिच्या कपड्यांवरून बोललो नाही. उलट मी तिला सपोर्ट करत होतो.
कारण जर आपण एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला करण्यापासून रोखत असून तर तो व्यक्ती ती गोष्ट अधिक करतो. यामुळे मी मलायकाला तिच्या कपड्यांवरून काही बोलत नव्हतो. अनेक चाहत्यांना असे वाटते की, अरबाज आणि मलायका यांच्या घटस्फोटाचे कारण मलायकाचे कपडेच होते.
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मलायका अरोरा हिने सांगितले होते, मला पुढच्या जन्मातही खान कुटुंबाचीच सून बनायला नक्कीच आवडले. मलायका आणि अरबाज खान यांचा एक मुलगा देखील आहे. अरहान खान असे त्याचे नाव आहे.